Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.६३ टक्के तर मृत्यूची संख्याह ४० हजारांच्या जवळ

Spread the love

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी १५ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर मृत्यूची संख्याह ४० हजारांच्या जवळ गेली आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही १५,०६,०१८ एवढी झाली आहे. तर मृत्यूची संख्या ही ही ३९,७३२ एवढी झाली आहे. राज्यात सध्या २,३६,४९१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर ३०२ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात १७ हजार ३०० रुग्ण बरे झालेत. तर १२ हजार १३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतल्या रुग्णांचा आकडा वाढला असून  दिवसभरात २२८९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान राज्यातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यात करोना मृत्यूंचे प्रमाण अजूनही चिंताजनकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या २.६४ टक्के इतका आहे.

आज सर्वाधिक ४७ मृत्यूंची नोंद मुंबई महापालिका हद्दीत करण्यात आली तर सातारा जिल्ह्यात २२ करोना बाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आज आणखी ३०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ३९ हजार ७३२ रुग्णांना या आजारात आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात सध्या २ लाख ३६ हजार ४९१ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत एकूण १२ लाख २९ हजार ३६९ रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.६३ टक्के झालं आहे. राज्यात आतापर्यंत ७४ लाख ८७ हजार ३८३ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १५ लाख ६ हजार १८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २३ लाख ५८८ जण होम क्वारंटाइन आहेत तर २४ हजार ९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. ठाणे जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची वाढ कायम असून आज १७४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा १ लाख ८९ हजार ६१ झाला आहे. तर १ लाख ६७ हजार ७११ रुग्ण बरे झाले असून सध्या १६ हजार ५७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच दिवसभरात जिल्ह्यात ४४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा वाढत ४ हजार ७७७ वर पोहचला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!