Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : आर्थिक गुन्हेशाखेला त्यांचा तपास करु द्या, औरंगाबाद जिमखाना क्लबची याचिका फेटाळली

Spread the love

औरंगाबाद – चेक बाऊन्स प्रकरणात आर्थिक गुन्हेशाखेला त्यांचा तपास करु द्या व या प्रकरणात आणखी कोणते अपराध उघडकीस येतात त्याचाही तपास लागू द्या असा आदेश न्या.नलावडे आणि न्या. सेवलीकर यांच्या खंडपीठाने औरंगाबाद जिमखाना क्लब ची याचिका फेटाळतांना दिला
औरंगाबाद जिमखाना क्लब मेंबर्सची मुंबईतील वडाळा भागातील ओंकार रिएलेटर्स अॅड डेव्हलपर्स, अॅनाॅटाॅमी रिएलेटर्स आणि सुराणा डेव्हलपर्स यांच्याकडे१३कोटी ४४लाख रु. गुंतवणूक केली होती. पण वरील तिन्ही बांधकामव्यावसायिकांना अचानक मोठा तोटा सहन करावा लागल्यामुळे जिमखाना क्लब ने आपली गुंतवणूक परंत घेण्याची तयारी सुरु केली.दरम्यान या गुंतवणूकीमधे जास्त नुकसान होऊ नये म्हणूनऔरंगाबाद जिमखाना ने हे नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्यूनलकडे धाव घेतली. ट्रिब्यूनलच्या आदेशानुसार वरील व्यावसायिकांनी चार टप्प्यात औरंगाबाद जिमखाना ला परताव्या पोटी १२कोटी ७१लाखांचे चेक आॅक्टो २०१९ ते जुलै २०२० या काळातील दिले.ते सीझ केलेल्या खात्याचे असल्यामुळे बाऊन्स झाले.त्यामुळे औरंगाबाद जिमखानातर्फे महेंद्र सुराणा यांनी आर्थिक गुन्हेशाखेकडे धाव घेतली.पण पोलिस या प्रकरणाचा तपास नीट करंत नसल्याचा ठपका ठेवत औरंगाबाद जिमखानाच्या वतीने खंडपीठात धाव घेतली.व पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यात हलगर्जीपणा करत आहेत.त्यांना योग्य रितीने तपास करण्याचे आदेश द्यावेत अशी याचिका जिमखानाक्लब तर्फे खंडपीठात करण्यात आली. पण न्या.टि.जे. नलावडे व सेवलीकर यांच्याखंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, कोव्हिड१९मुळे पोलिसांना या प्रकरणातील पुरावे गोळा करण्यात अडचण आली असावी आता आर्थिक गुन्हेशाखेचा तपास सुरळित चालू आहे.त्यांना तपास पूर्ण करु द्या असे म्हणंत याचिका फेटाळली.या प्रकरणात अॅड. निलेश घाणेकर, यश आनंद, आणि अॅड. एस.जी.सलगारे यांनी काम पाहिले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!