Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पायल तडवी प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Spread the love

मुंबईतील नायर रुग्णालयात गेल्या वर्षी डॉ. पायल तडवी या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी असलेल्या तीन महिला डॉक्टरांना आपला पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली आहे. या प्रकरणात महिला डॉक्टर डॉ. पायल तडवीने कथित स्वरूपात जातीवर आधारित भेदभावामुळे आत्महत्या केली होती. या प्रकरणातील तिन्ही आरोपी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयांमध्ये तीन वर्षीय पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. या विषयांमध्ये या डॉक्टरांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. या आरोपी डॉक्टरांनी डॉ. पायल तडवी हिच्याशी जातीवर आधारित भेदभाव केल्याचा आरोप आहे. या आरोपी डॉक्टरांना पुन्हा आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी परवानगी दिली गेली पाहिजे असे न्यायमूर्ती उदय यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले. न्यायालयाने ही परवानगी सशर्त दिली आहे.

दरम्यान कोर्टाने हा निकाल देताना आपल्या आदेशात म्हटले आहे कि , या अभ्यासक्रमादरम्यान आरोपींनी कोणत्याही साक्षीदाराला वळवण्याचा प्रयत्न करता कामा नये, तसेच आरोपी कनिष्ठ न्यायालयात प्रत्येक तारखेला हजर राहतील . सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या वर्षीच्या फेब्रुवारीतील आदेशाविरोधात हेमा आहूजा, भक्ती मेहारे आणि अंकिता खंडेलवाल या आरोपी डॉक्टरांच्या याचिकेवर निकाल दिला होता. डॉ. पायल तडवी देखील याच विभागात अभ्यास करत होत्या. तडवी यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आपल्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. हायकोर्टाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या प्रकरणात आरोपींना जामीन मंजूर केला होता. त्यावेळी काही अटी शिथिल करताना हायकोर्टाने एक अट शिथिल करण्यास नकार दिला होता. आरोपी संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात, विशेषत: कॉलेजमध्ये प्रवेश करणार नाहीत असे त्यावेळी हायकोर्टाने म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!