Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चौथ्या तिमाहीत महागाई कमी होऊ शकते , रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा

Spread the love

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.  माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचेही दास म्हणाले. तसेच  आगामी काळातही महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असून करोना महासाथीच्या संकटामुळे मागणीदेखील कमीच राहण्याची भीती रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेची बैठक २८ सप्टेंबर रोजी पार पडणार होती. परंतु गणसंख्येअभावी ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत महागाई कमी होऊ शकते आणि रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याच्या जवळपास राहण्याची शक्यता असल्याचेही दास म्हणाले.

शक्तिकांत दास  पुढे म्हणाले कि , रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतेही बदल केले नाही. रेपो दर चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले असल्यानं व्याजदरातही कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. याव्यतिरिक्त रिव्हर्स रेपो दरातही बदल करण्यात आलेले नाहीत. तसंच डिसेंबर २०२० पासून ग्राहकांना कोणत्याही वेळी आरटीजीएस सुविधेचाही वापर करता येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे. भारतीय वित्तीय बाजारातील तरलता वाढविण्यासाठी काही क्षेत्रांना आर्थिक मदत देणं, निर्यातीस चालना देणं आणि पेमेंट सर्व्हिस सिस्टमच्या माध्यमातून व्यवसाय करण्यास सुलभता निर्माण करून देणं यासारख्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेकडून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोलाची मदत केली जात आहे. मार्च २०२२ पर्यंत रिझर्व्ह बँकेनं एक लाख कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद केली आहे.

सिस्टम आधारित ऑटोमॅटिक कॉशन लिस्टिंगच्या मदतीनं याप्रकरचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परदेशी खरेदीदारांशी करार करण्यासाठी अधिक सुविधा जाहीर केल्या आहेत. “कोरोना संकटामुळे देशात निर्माण झालेली भीती आणि निराशेचे वातावरण आता आशेत बदलू लागलं आहे. असं दास म्हणाले.  तसंच सुरू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहू शकतो. तसंच निरनिराळ्या क्षेत्रांसोबतच भारतात तेजीनं आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. कृषी, कंझ्युमर गूड्स, वीज आणि औषध क्षेत्रात तेजीनं वाढ होण्याची शक्यताही दास यांनी व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!