Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangrapeCase : उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची समाजवादी जनपरिषदेची मागणी

Spread the love

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात झालेला सामूहिक बलात्कार, हत्या आणि त्या प्रश्नावरून निर्माण झालेली परिस्थिती देशभर चिंता निर्माण करणारी आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकार तातडीने बरखास्त करावे अशी मागणी समाजवादी जनपरिषद महाराष्ट्र अध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री योगी च्या काळात उत्तर प्रदेशात मध्ये देशातील कायदा आणि सुव्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. हाथरसची घटना त्यापैकीच एक आहे, असे सांगून  ढोबळे पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशचे आकडे पाहता देशात कायद्याचे राज्य आहे की नाही ? असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे . अत्याचारग्रस्त मुलीचे प्रेत तिच्या कुटुंबीयांकडे न देता मध्यरात्री अंत्यविधी करणे म्हणजे राज्य यंत्रणेकडून संपूर्ण  पुरावाच नष्ट करण्याचा प्रकार होय.  मागील सत्तर वर्षाच्या लोकशाही राजवटीत सरकारी यंत्रणेने या प्रकारचे पुरावे नष्ट करण्याची ही पहिलीच घटना होय.  त्यामुळे काही पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करणे पुरेसे नसून या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिस अधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनात्मक कायदा यंत्रणेचा विश्वास गमावला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असतानाही ते कायदेशीररीत्या न हाताळतात अन्यायग्रस्त कुटुंबावर अन्याय केला आहे. परिणामी उत्तर प्रदेश सरकार संविधान तरतुदीचा भंग करत असून आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असल्याची सकृतदर्शनी परिस्थिती आहे . देशात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे हे स्पष्ट करण्यासाठी सरकार बरखास्त करावे असे ढोबळे यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!