Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SSKDeathCase : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली , एम्सचा अहवाल सीबीआयने स्वीकारला

Spread the love

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की यामध्ये काही घातपाताचा प्रकार होता याविषयी सीबीआयकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणी AIIMS ने त्यांच्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. आता सीबीआयने देखील हे मान्य केले आहे की सुशांतने आत्महत्याच केली होती. सीबीआयने अनेकदा त्यादिवशी नेमकं काय घडलं हा सीन रिक्रेएट केला आणि त्यानंतर ते या निर्णयावर पोहोचले आहेत की अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिले आहे.

याप्रकरणाची पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी सीबीआयने एम्सकडून याप्रकरणात दुसऱ्यांदा तपास करण्यास सांगितले होते. एम्सच्या अहवालानुसार सुशांतने विष खाल्ले असावे असा कोणताही पुरावा मिळाला नाही आहे. त्याप्रमाणे ही घटना घातपाताचा प्रकार असावा याबाबतही कोणताही पुरावा मिळाला नाही आहे. ना त्याच्या शरिरावर कोणतीही जखम आढळली आहे ना ही त्याठिकाणी कुणी जबरदस्तीने शिरल्याचा पुरावा आहे. सीबीआय सूत्रांच्या मते याप्रकरणात सीबीआयने २४ हून अधिक  जणांची चौकशी केली आहे. यामध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, रियाचे आई-वडील, सुशांतच्या घरचे सदस्य, त्याचा स्टाफ, मॅनेजर आणि इतर काही बड्या व्यक्तींच्या नावाची चौकशी झाली आहे. दरम्यान एम्सच्या फॉरेन्सिक डॉक्टरांची टीम याप्रकरणी तपास करत होती. या टीमचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी असे म्हटले आहे की, ‘आम्ही आमचा अंतिम अहवाल दिला आहे. हे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण आहे. त्याच्या शरीरावर गळफासाच्या निशाणाशिवाय कोणत्याही खुणा नाही आहेत. त्याच्या शरीरावर आणि कपड्यावर देखील झटापटीच्या खुणा नाही आहेत.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!