Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ड्रग प्रकरणातून रियाची एक महिन्यानंतर होतेय सुटका , प्रसारमाध्यमांना पोलिसांनी दिली हि तंबी….

Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतांची मैत्रीण रिया चक्रवर्तीला तब्ब्ल एक महिन्यानंतर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र तिने आपला पासपोर्ट जमा करावा तसेच  पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करू नये असे न्यायालयाने म्हटले आहे.  रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुशातं सिंह मृत्यू प्रकरणात  रिया चक्रवर्तीला ड्रग कनेक्शन प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती.  अब्दुल बसितचा आणि शोविकचा जामीन अर्ज मात्र कोर्टाने फेटाळला आहे. दरम्यान रियाची सुटका होताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिच्याशी बोलू नये , तिचा पाठलाग करू नये अन्यथा कारवाई होईल असा इशारा पोलिसांनी माध्यमांना दिला आहे.


रियाची जामिनावर सुटका करताना कोर्टाने सांगितलं आहे की, “रियाने सुटकेनंतर दर १० दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसंच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं”. रियाचे वकील सतीश मानेशिदें यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “अखेर सत्याचा विजय झाला आहे. आम्ही सादर केलेले पुरावे न्यायालयाने मान्य केले आहेत. रियाची अटक आणि कोठडी ही असमर्थनीय आणि कायद्याच्या पलीकडे होती. सीबीआय, ईडी आणि एनसीबीने तिचा पाठलाग करणं आता थांबलं पाहिजे. आम्ही सत्य़ाशी बांधील आहोत. सत्यमेव जयते”.

एनसीबीच्या विशेष पथकाने दि . २८ ऑगस्टला ड्रग प्रकरणात तपास करताना अवघ्या १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केलं होतं. सुशांत सिंहच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.  ड्रग्ज प्रकरणी ८ सप्टेंबरला एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती.

प्रसारमाध्यमांना पोलिसांची तंबी , पाठलाग कराल तर कारवाई होईल

दरम्यान यावेळी माध्यमांनी रिया चक्रवर्तीचा पाठलाग करु नये अशी सूचना मुंबई पोलिसांनी केली असून तसे केल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन जप्त करण्यात येईल, असेही स्पष्ट केलं आहे. रिया जेलमधून बाहेर आल्यानंतर माध्यमांनी तिच्याससमोर गर्दी करू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. ‘कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत किंवा त्यांचे चित्रीकरण करणं कायद्यानं गुन्हा आहे. यामुळं तुम्ही स्वतःचे आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात घालत असता. याबाबत मुंबई पोलीस कडक कारवाई करणार आहेत,’ असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. ‘कोणत्याही पद्धतीनं पाठलाग, अडवणुकीला प्रोत्साहन देऊ नका. चालकाबरोबरच जो त्याला अशा पद्धतीनं वागण्याच्या सूचना देत आहेत किंवां तसं वागण्यास भाग पाडत आहेत त्यावरही कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन होत असल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गंत वाहन जप्त करण्याचा अधिकार असून ही कडक कारवाई असेल,’ असंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!