Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्रातून सुरु होताहेत पाच शहरादरम्यान आंतरराज्य रेल्वे

Spread the love

मध्य रेल्वेने  आज महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातंर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यास मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात रेल्वे सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर पाच जिल्ह्यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने  घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत येणाऱ्या अनावश्यक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्याचबरोबर राज्य सरकारनेही  राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारनं दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले होते.

दरम्यान राज्य सरकारने  ३० सप्टेंबर रोजी मिशिन बिगिनसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करताना राज्यातील रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर अखेर पाच शहरांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ ऑक्टोबरपासून रेल्वेसेवा सुरू होणार असून, दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने  दिली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!