Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangrapeCase : अखेर केंद्रीय समाजकल्याणमंत्री आठवले हाथरसमध्ये पोहोचले, पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Spread the love

त्तर प्रदेशातल्या हाथरसच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले कुठे आहेत ? असा प्रश्न माध्यमातून विचारला जात असताना  अखेर त्यांनी काल मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आरपीआय या आपल्या पक्षाकडून त्यांनी पीडित कुटुंबीयांना ५ लाखांची मदतही केली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असं आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिलं. या भेटीनंतर आठवले यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यापूर्वी त्यांनी लखनौ येथे जाऊन राज्यपालांचीही भेट घेतली होती.

दरम्यान आठवले हाथरसमध्ये का जात नाहीत असा सवाल विरोधी पक्षांनी केला होता. आठवले यांनी कंगणा राणौत आणि पायल घोष या अभिनेत्रींसाठी वेळात वेळ काढून त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी राज्यपालांना भेटणारे देशाचे समाजकल्याण मंत्री  कुठे आहेत अशीही टीका करण्यात आली होती. आठवले यांनी या आधी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. अशातच भाजपचे एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक आणि संतापजनक विधान भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार आहे. हाथरस प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुक्तफळं उधळली. घटनेनंतर पोलिसांनी ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले त्यावरून राज्य सरकारवर प्रचंड टीका झाली होती. पीडित मुलीचं पार्थिव कुटुंबीयांना न देता परस्पर अंत्यसंस्कार पोलिसांनी केले होते. त्यावरून प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!