Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : केंद्र सरकारकडून देशातील सिनेगृहे सुरु करण्यास सशर्त मान्यता , अशा आहेत अटी

Spread the love

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या लागू केल्यापासून बंद असलेली चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.  त्यानुसार अनलॉक पाचमध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केचं प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. मार्च महिन्यापासून शाळा, चित्रपटगृह बंद आहेत. आता त्यांना उघडण्यास परवानगी दिली  आहे. दरम्यान, आज चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सिने इंडस्ट्रीला दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ ५० टक्केच प्रेक्षकांच्या अटीवर सिनेमा थिएटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज १५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करता येईल अशी माहिती ,  प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.  दरम्यान चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे. आसनव्यवस्था राखीव ठेवू नये. प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावं. आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा. थर्मल स्क्रिनिंग करावी, केवळ लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाचा चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा

आपलं सरकार

Click to listen highlighted text!