Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HatharasGangRapeAndMurederCase : पीडितेच्या कुटुंबीयांचा नार्को आणि पॉलिग्राफ  चाचणीला विरोध, प्रकरण अलाहाबाद कोर्टात

Spread the love

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी हाथरस सामुहिक बलात्कार हत्येप्रकरणात फिर्यादी , आरोपी आणि सर्वच संबंधितांची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी होईल असे सांगितले आहे. मात्र  या अमानुष प्रकरणात मृत्यू झालेल्या तरुणीच्या कुटुंबियांची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीला स्थगिती मिळावी यासाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली असून पीडित कुटुंबियांनी आपल्याला नार्को चाचणी करायची नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही चाचणी त्यांच्यावर लादली जात आहे. दरम्यान सर्वोच्च  न्यायालयाने २०१० मध्ये म्हटलं होतं की, ज्या व्यक्तीची नार्को चाचणी करायची आहे, त्या व्यक्तीची संमती असल्याशिवाय ती करता येणार नाही.

योगी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी  विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या तीन सदस्यीय एसआयटीच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणातील दोन्ही पक्षाकडील लोकांच्या नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फिर्यादी पीडित कुटुंबीय तसेच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नार्को चाचणी होणार आहे. गोखले यांनी आयपीसीच्या कलम २२६ नुसार हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी कोर्टाला उद्देशून म्हटलं की, “सरकारनं दिलेला हा आदेश अयोग्य आहे. त्यामुळे पीडित कुटुंबियांच्या नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी. ही नार्को चाचणी केवळ बेकायदाच नसून ती पीडित कुटुंबाला १२ ऑक्टोबर रोजी कोर्टात काय सांगायचं याबाबत दबाव आणण्यासाठीचा प्रयत्न आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!