Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ८१ हजार ४८४ नवे रुग्ण , १९९५ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८१ हजार ४८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे १९९५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ६३ लाखांहून अधिक झाली आहे. तर कोरोनामुळे मृतांचा एक  लाखांच्या पुढे पोहचला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येत भारत सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर  एकूण मृत्यूच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दुसरीकडे कोरोनाचा मृत्यूदर जरी देशात कमी असला तरी दररोज सरासरी हजाराच्या आसपास रुग्णांचा कोरोनाने मृत्यू होत आहे.

दरम्यान देशात  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. तरीही कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कोरोना व्हायरसमुळे देशातील मृतांचा १ लाखांवर गेला आहे. Worldometers.info वेबसाइटनुसार, करोनापासून आतापर्यंत जगात एकूण १,०२९,७१९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी अमेरिकेत सर्वाधिक २१२,९१२ मृत्यू आहेत. तर भारतात ही संख्या १००,३२३ आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्युंमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. को रोनाने मृत्यूच्या बाबतीत भारत अमेरिका आणि ब्राझीलनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेबसाइटनुसार, करोनाने ब्राझीलमध्ये आतापर्यंत १४४,७६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर मेक्सिकोमध्ये ७८,०७८ मृत्यू झाले असून हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. देशात ३० जानेवारीला पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर गेल्या ८ महिन्यांत सप्टेंबरमध्ये देशात केवळ ४१.५३ टक्के म्हणजे २६ लाख २१ हजार ४१८ नवीन रुग्ण आढळून आले.

Worldometers वेबसाइटनुसार, अमेरिकेत ७,५०७,५२४ करोना रुग्ण आहेत. आतापर्यंत जगात २ कोटी ५७ लाख ७३ हजार ७६४ नागरिक करोनाने बरे झाले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण ५३,९३,७३७ आजार रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर ब्राझीलमध्ये ४,२१२,७७२ आणि अमेरिकेत ४,७५०,१७६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान दिल्ली आणि मुंबई या दोन महानगरांमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. करोना व्हायरसमुळे शुक्रवारी दिल्लीत ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राजधानी दिल्लीतील करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही ५४३८ वर पोहोचली आहे. तर २९२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २.८५ लाख झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी २९ सप्टेंबरला ४८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!