UttarpradeshCrimeUpdate : भयानक : हाथरस पाठोपाठ बलरामपूरमध्येही तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना , पाय आणि कंबर तोडली , मुलीचा मृत्यू …!!

Spread the love

देशभरात उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे लागलेली आग विझत नाही तोच उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये आणखी एक भयानक घटना घडली असल्याचे वृत्त आहे .  या घटनेत महाविद्यालयात प्रवेशासाठी गेलेल्या २२ वर्षीय दलित मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याने तिचाही मृत्यू झाला आहे. राज्यात हाथरस येथील प्रकरण गाजत असतानाच हि घटना घडल्याने पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्नात होते असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे . य प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.


 

पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी बीकॉम मध्ये प्रवेश घेण्यासाठी दि . २९ रोजी सकाळी १० वाजता  त्यांचे गाव गैसडीहून गेली होती . संध्याकाळचे ७ वाजत आले तरी मुलगी घरी न परतल्याने तिचे कुटुंबीय काळजीत होते . तिचा मोबाईलही बंद येत होता . दरम्यान रात्री तिला एका रिक्षावाल्याने गंभीर अवस्थेत तिला घाई आणून सोडले . त्याची रिक्षा रक्ताने माखलेली होती आणि तरुणीही चिखल मातीने माखलेली होती . तिला बोलताही येत नव्हते आणि नीट उभेही राहता येत नव्हते . रिक्षावाल्याने सांगितले कि ती पडलेली दिसल्याने आपण तिला घरी आणले . शिवाय तिला ग्लुकोज चढविल्याचे तिच्या हातावर लावलेल्या पट्टीवरून दिसत होते. मुलीची हि अवस्था पाहून तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा ती एवढेच म्हणाली कि , आई , खूप दुखते आहे . मी वाचणार नाही . मला जगायचे आहे. त्यावर तिला स्थानिक डॉक्टरकडे उपचारासाठी नेले असता , मुलीची स्थिती खूप गंभीर आहे तिला शहरात घेऊन जा असे डॉक्टरने सांगताच तिला लखनौला घेऊन जात असताना रस्त्यात तुलसीपूर नजीक मृत्यू आला. नंतर जेंव्हा कुटुंबीयांनी गैसडी पोलीस ठाणे गाठले तेंव्हा स्थानिक पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली नाही . अखेर उशिरा गुन्हा दाखल करून पीडित तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. मुलीच्या आईने सांगितले कि , आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची कंबर आणि हात -पाय तोडून टाकले . परंतु बलरामपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक देवरांजण वर्मा यांनी सांगितले कि , पाय आणि कंबर तोडले कि नाही हे पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावर समजेल. तोपर्यंत काहीही सांगत येणार नाही.

दरम्यान या प्रकरणात  तातडीने कारवाई करून दोन  आरोपींना अटक केल्याचं बलरामपूर पोलिसांनी सांगितलं आहे. पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. तिच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गंसडी कोतवाली परिसरातील आहे. बी-कॉमच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी पचपेडव्याच्या महाविद्यालयात गेला होती. महाविद्यालयातून परतत असताना मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि गंसडी शहरातील एका खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ज्या खोलीत पीडितवर सामूहिक बलात्कार झाला ती एका किरणा दुकानाची मागची बाजू आहे. किराणा दुकान चालवणारा तरुणच या घटनेचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जातं आहे. सामूहिक बलात्कारानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने आरोपींनी एका खासगी डॉक्टराला तिच्यावर उपचार करण्यासाठी बोलावलं होतं. पण डॉक्टराने पीडित तरुणीला खोलीत एकटं पडलेलं पाहून तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि तिच्या घरच्यांना कळवण्यास सांगतिलं.

तिच्या कुटुंबीयांनी  दोन मित्रांनी मैत्रीच्या बहाण्याने मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिची कंबर आणि पाय मोडले गंभीर अवस्थेत असलेल्या या मुलीला रिक्षातून घरी पाठवले. नंतर तिचा मृत्यू झाला. तिला आधी इंजेक्शन दिलं गेलं आणि मग तिच्यावर आत्याचार केला गेला, असा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचे नाव शाहिद आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव साहिल आहे. दोघेही गैंसडीचे राहणारे असून पुढील तपस चालू आहे.

पीडित मुलगी अत्यंत हुशार होती आणि तिला समाजसेवेची आवड होती. गावात ती एका संस्थेच्या वतीने दोन वर्षांपासून ग्रामस्थांना आधुनिक शेतीचे धडे देत होती. तिच्यावर घडलेल्या या प्रसंगामुळे गावात संतापाची लाट लाट उसळली आहे. हाथरसच्या  घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रारंभी गुन्हा दाखल करून प्रकरण गांभीर्याने न घेणाऱ्या पोलिसांनी तत्काळ हालचाली करून मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. त्याठिकाणी ४ डॉक्टरांनी तिचे पोस्टमार्टेम केले आणि  रात्री उशिरा पीडित तरुणीचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.