Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील १६ पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएसचा दर्जा

Spread the love

केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याच्या  पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) संवर्गात  पदोन्नती दिली असून  बुधवारी याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत . या आदेशामुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखिल भारतीय पोलीस सेवेत दरवर्षी २५ टक्के जागा स्थानिक राज्य पोलीस सेवेतून भरल्या जातात. त्यासाठी प्रत्येक राज्य आपल्या राज्याच्या कोटय़ानुसार पात्र उमेदवारांचे प्रस्ताव के ंद्रीय लोकसेवा आयोगास पाठवितात. त्यानंतर लोकसेवा आयोग पात्र उमेदवारांची निवड करून अंतिम यादी केंद्र सरकराला कळविते. राज्य पोलीस सेवेत अधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) पदोन्नती होते. त्यासाठी राज्य कोटय़ातील २०१७ आणि २०१८ तसेच संवर्गात वाढलेल्या अशा आयपीएसच्या एकूण १६ जागांसाठी सेवाज्येष्ठतेनुसार ५१ पात्र अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाची यादी गृह विभागाने लोकसेवा आयोगास पाठविली होती. त्यातून आयपीएस म्हणून पदोन्नती मिळालेल्या या अधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून सन २०१७च्या तुकडीमध्ये एस. जी. वायसेपाटील, ए. एम.बारगळ, एन. टी. ठाकू र, एस. एल. सरदेशपांडे, नितीन प्रभाकर पवार, डी. पी. प्रधान, तर सन २०१८च्या तुकडीमध्ये एम. एम. मोहिते(शीला डी सैल), पांडुरंग पाटील, टी.सी दोशी, डी.बी पाटील(वाघमोडे) एस.एस. बुरसे, सुनीता साळुंखे- ठाकरे, एस. एन.परोपकारी, एस. एस. घारगे, रवींद्रसिंग परदेशी आणि पुरुषोत्तम कराड यांची निवड झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!