Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : हाथरस : पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की , कार्यकर्त्यांवर लाठीमार

Spread the love

उत्तर प्रदेशच्या  हाथरस सामूहिक बलात्कार पीडित्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याना ग्रेटर नोएडाजवळ पोलिसांनी रोखले. त्यानंतर हाथरसला पायीच जाण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला. मात्र यमुना एक्स्प्रेस वेवर त्यांना प्रशासनाने पुन्हा रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी तेथेच धरणे दिले. शेवटी पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी मला धमकी देत खाली पाडल्याचे राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. मला एकट्याला हाथरसला जाऊ द्या असा मी पोलिसांकडे आग्रह धरला, मात्र पोलिसांनी आपला हा आग्रह मान्य केला नाही. एकट्या व्यक्तीवर कलम १४४ लागू होत नाही असे आपण म्हटले. मात्र पोलिस ऐकायला तयार नव्हते. आपल्याला पीडित कुटुंबाला भेटायचे आहे, असे राहुल म्हणाले. दरम्यान प्रियांका गांधी यांनी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचे ट्विट केले आहे.

पोलिसांनी मला धक्का मारून खाली पाडले- राहुल गांधी

या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले कि , मी हाथरसला जात असताना मला अडवताना पोलिसांनी मला धक्का देऊन खाली पाडले, त्यानंतर माझ्यावर लाठ्या चालवल्या आणि मला जमीनीवर पाडले, असे राहुल गांधी म्हणाले. या देशात काय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच फिरू शकतात का, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. आमची गाडी अडवली गेली, त्यामुळे आम्ही पायीच हाथरसला जात होतो, असे ते म्हणाले. तर, राहुल गांधी यांच्या हाताला मार लागल्याचा दावा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजयसिंह लल्लू यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या हाताला पोलिसांनी धक्काबुक्की केली, त्यामुळे त्यांना मार लागला आहे. ते आता रस्त्यावर बसलेले आहेत. ते सध्या जखमी अवस्थेत आहेत, असे लल्लू यांनी सांगितले.

राहुल गांधी  आणि  प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

काँग्रेसनेते राहुल गांधी  आणि  प्रियांका गांधी यांना ग्रेटर नोएडाजवळ रोखले गेले. त्यानंतर दोघेही आपल्या कार्यकर्त्यांसह पायीच हाथरसच्या दिशेने चालू लागले. मात्र पोलिसांनी त्यांना यमुना एक्स्प्रेस वेजवळ पुन्हा रोखण्याचा प्रयत्न केला. येथेच राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये खेचाखेची झाली. त्यानंतर ते तेथेच धरणे देत बसले. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ते  पायीच हाथरसकडे जाण्यासाठी निघाले आहेत. ज्या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रोखण्यात  आले आहे ते  ठिकाण हाथरसपासून जवळपास १४० किलोमीटर दूर आहे.

दरम्यान काँग्रेसचे मीडिया संयोजक ललन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हाथरस प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट करण्यासाठी निघाले असताना रस्त्यातच ग्रेटर नोएडा पोलिसांच्या ताफ्यानं परी चौक भागात त्यांना रोखलं. याचा प्रियांका गाधी यांनी हाथरस प्रकरणातील मृत पीडितेच्या वडिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. गुरुवारी सकाळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाकडून पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले तीन पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्याचं सांगण्यात आलं. सोबतच, करोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हाथरसमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ लावण्यात आल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं. जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून जिल्हा व पोलीस प्रशासनाने मीडियालाही हाथरसपासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावरच अडवण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाथरस गँगरेप पीडितेला न्याय देण्याची मागणी करत गुरुवारी डीएनडी फ्लायवेवर आंदोलन केलं. या दरम्यान यूपीच्या योगी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!