Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : हुंड्यासाठी विविध भागात तिघींचा छळ आणि इतर घटना

Spread the love

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागातील तीन महिलांचा हुंड्यासाठी तसेच अन्य कारणासाठी मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. या प्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईलचे दुकान टाकण्यासाठी तुझ्या आईकडून पाच लाख रूपये घेऊन ये अशी मागणी करित विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी प्रमोद परदेशी, भरत परदेशी, प्रशांत परदेशी, अनिल परदेशी यांच्यासह दोन महिला रा. पडेगाव यांच्या विरोधात एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी- बीयाणेचे दुकान टाकण्यासाठी पाच लाख घेवून ये असे सांगत घरगुती कारणावरून मारहाण केल्या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून खान जमील कुरैशी, जमील नुर कुरैशी, चार महिलांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका अन्य प्रकरणात विवाहितेला माहेरून लाख रूपये घेऊन ये, तसेच विवाहितेला झालेली मुलगी अपंग असल्याकारणाने सासरकडील नातेवाईकांकडून छळ केला जात होता. या प्रकरणामध्ये दांपत्यांमध्ये वाद सुरू होता. सदर वाद हा महिला सहाय्यता कक्ष येथेही पोहोचला होता. या प्रकरणात सासरकडील मंडळी हजर झाले नाही. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मोहसीन उस्मान, शेख उस्मान, शेख मोबीन, शेख मतीन, शेख नदीम, शेख मोईस, शेख साहिल आणि एक महिला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

दारू पिऊन सावत्र आईला मारहाण

औरंंंगाबाद : दारू पिवून आल्यानंतर घराच्या गेटला लाथा मारून सोमीनाथ पेठारे रा. बायजीपूरा याने त्याच्या सावत्र आईला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच आईला मारहाण करताना पाहुन लहान मुलगा रॉबीन हा सोडविण्यासाठी आले असता, त्यालाही मारहाण केली. ही घटना २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून प्रताप सोमीनथ पेठारे रा. बायजीपूरा याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूचे पैशावरून मारहाण
बीड बायपास रोडवर अनिसा पान टपरीजवळ २८ सप्टेंबर रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान आसेफ पठाण (वय २०, रा. देवळाई गाव) याला दारूचे पैसे देत नाही. या कारणावरून आकाश बहोत तसेच कृष्णा उर्फ कान्हा या दोघांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सिगरेट दिली नाही म्हणुन मारहाण
तुम्ही माझ्या मुलाला पन्नास रूपयात का सिगारेट देता असे सांगत अयाज पटेल रा. हर्सुल याने एका महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अयाज पटेल रा. हर्सुल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध अपघात तिघे जण जखमी

औरंंंगाबाद : शहरात विविध भागात झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहे. मदत न करता, तसेच अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेलेल्या वाहन धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान सलीम अली सरोवर जवळील रोडवर भरधाव वेगाने कार (एमएच-४३-आर-०१८६) ने मोटारसायकल क्रमांक (एमएच-२०-ईबी-२०१०) ला धडक दिली. या घटनेत रामलाल पंडीत गाभुड (वय ३०, रा. मुकुंदवाडी) हे मोटारसायकलस्वार जखमी झाले. याप्रकरणी रामलाल पंडीत गाभुड याच्या फिर्यादीवरून कार चालकाच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य प्रकरणात एक ट्रक्टर चालकाने २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीयु-२०४२) ला धडक दिली. या प्रकरणी अरविंद शिवाजीराव देशमुख रा. हडको यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गरवारे रोडने सिडको बस स्थानकाकडे जात असताना, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजेच्या दरम्यान एका कार क्रमांक (एमएच-२०-डीजे-९२८८) च्या चालकाने मोटारसायकल क्रमांक (एमएच-२०-एई-८१४७) ला धडक दिली. या घटनेत मोटारसायकल चालक सोमीनाथ म्हस्के रा. सिडको हे जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून कार चालकाच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुनहा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!