Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : एमजीएम कॉलेज समोरील हुक्का पार्लरवर कारवाई, हॉटेल मालकासह १६ जणाविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंंंगाबाद : गेल्या अनेक महिन्यापासून एमजीएम महाविद्यालयासमोर बिनबोभाटपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर सिडको पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी हॉटेल चालकासह हुक्याच्या सहाय्याने धुम्रपान करणारे ग्राहक असे १६ जणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
एमजीएम महाविद्यालयासमोरील हॉटेल सुफीज लाँन्ज येथे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त निशीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार दिनेश बन, जाधव, सिरसाठ, डोंगरे, सोनवणे, पठाण आदींनी सुफीज लॉँन्ज हॉटेलवर छापा मारला. त्यावेळी हॉटेल चालक इम्रान खान गुलाब खान (वय ३०, रा.टाईम्स कॉलनी), ग्राहक सरफराज चिश्ती शकील चिश्ती (वय २०, रा.आरेफ कॉलनी), राहुल आत्माराम साळवे (वय २३, रा.पडेगाव), आनंद बाबूराव खापरे (वय २३,रा.शिवाजीनगर, ता.अंबड,जि.जालना), ऋषिकेश विष्णू नाब्दे (वय २१, रा.शिवाजीनगर), सागर संतोष वारेकर (वय २७, रा.कासलीवाल मार्वेâट), स्वप्निल रामराव नागरगोजे (वय २७, रा.हरिरामनगर), प्रविण मच्छिंद्र झिंझुर्डे (वय २३, रा.गादिया विहार), प्रतिक किरीट सोनी (वय २७, रा.सिडको एन-७), तौसीफ रमीज खान पठाण (वय २४, रा.अंबरहिल जटवाडा रोड), अमिर सुभान पटेल (वय २३, रा.चिश्तीया चौक), सय्यद सरफराज सलीम (वय २५, रा.रहेमानिया कॉलनी), मंहमद समीर महमंद नासेर खान (वय २१, रा.बेगमपुरा-मकबरा रोड), शेख इम्रान शेख गुलाब (वय २५, रा.जहाँगीर कॉलनी), सय्यद जुबेर सय्यद पाशा (वय २३, रा.आझाद चौक), आमीर रसद पठाण (वय २६, हडको) हे हॉटेलमध्ये हुक्याच्या सहाय्याने धुम्रपान करतांना मिळून आले. पोलिसांनी हॉटेलमधुन ३ हजार ५०० रूपये विंâमतीचे ३ हुक्का पॉट, ३ हजार रूपये विंâमतीचे २० पॉकेट तंबाखू फ्लेवर असा एवूâण ६ हजार ५०० रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १६ जणांविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलेटसह तीन दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या

औरंंंगाबाद : शहरातील विविध भागातून चोरट्यांनी एका बुलेटसह तीन दुचाकी चोरून नेल्या. गजानन विठ्ठल बोंन्ड्रे (वय ४०, रा. विटावा, औरंगाबाद) यांची बुलेट मोटारसायकल क्रमांक (एमएच-२०-बीव्ही-७३९१) ही बुलेट अज्ञात चोरटयाने २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान कंपनीच्या पार्किंगमधुन चोरून नेली. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसNया घटनेत, घटनेत २९ सप्टेंबर रोजी एसबीआय बँकेसमोर एका महिलेने त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीयू-६६२८) उभी केली होती. ही दुचाकी दुपारी १.३० ते ३.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने चोरून नेली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच अक्षय धोंडू शिंदे (वय २५, रा. हनुमाननगर) यांची मोटारसायकल क्रमांक (एमएच-२०-बीके-३१६८) ही अज्ञात चोरटयाने १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते १०.३० दरम्यान चोरून नेली. या प्रकरणी पुंडलिकनगर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!