Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : जाणून घ्या अनलॉक-५ अंतर्गत उद्यापासून काय सुरु होणार ?

Spread the love

कोरोनामुळे सर्व अर्थकारण उद्धवस्त झालेले असताना राज्याची आणि देशाची अर्थ व्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉक पाच मध्ये सोशल डिस्टनसिंगचे नियम पळून अनेक गोष्टी सुरु करण्यास अंशतः परवानगी दिली आहे . या निर्णयानुसार राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारने  रेस्टॉरंट , हॉटेल व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारने  घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान कोरोनाच्या संसर्गावर मत करण्यासाठी कंटेन्मेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात यावा असेही या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या  निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, ऑक्टोबरपासून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने  यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी होत होती. त्यासंदर्भात राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एकूण क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं बंधन सरकारन घातलं आहे. मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत येणाऱ्या अनावश्यक वस्तूंचे  उत्पादन करणाऱ्या उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने  राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारने  दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने  दिले आहेत.

दरम्यान प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन व कोविड मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारनं मुंबईतील डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशात अर्थात एमएमआर विभागात डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क्यूआर कोड देण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानेही अनलॉक -५  चे गाईडलाईन्स जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अनलॉक-५ मध्ये चित्रपटगृह ५० टक्के क्षमतांनी सुरू करता येणार आहे. या टप्प्यात नवरात्र, दुर्गा पूजा, दसरा यांसारखे सण येणार आहेत. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर लोकांना सणांचा आनंदही घेता यावा याची काळजी घेतली गेली आहे.

अनलॉक -४ मध्ये केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यासाठी अंशत: परवानगी दिली असून काही राज्यांनी २१ सप्टेंबरपासून देशभरात अंशीक स्वरुपात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहेमात्र अद्यापही अनेक राज्यांमध्ये शाळा बंदच आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यासाठी केंद्राच्या परवानगी प्रतीक्षा आहे. कर्नाटकात मात्र १५ ऑक्टोबरपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबरपर्यंत शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बोलावणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या एक दिवसात ८० हजार ४७२ नवीन रुग्ण समोर आल्यानंतर बुधवारी देशात संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून ६२ लाखांहून अधिक झाली आहे. तर संसर्गापासून बरे झालेल्यांची संख्या  ५१ लाख ८७ हजार ८२५ इतकी झाली आहे.

याआधी ठरविल्यानुसार  ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था बंद राहतील. अनेक सेवा सुरू करण्याची परवानही दिली असली तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार असून अन्यथा दंड भरावा लागू शकतो व कारवाई केली जावू शकते. याशिवाय अनलॉक-५ मध्ये  राज्यात मात्र चित्रपटगृह, स्वीमिंग पूल सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुणे विभागातील लोकल ट्रेन्स होणार सुरू होणार असून  मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढवण्याचा तसेच राज्यांतर्गत लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!