Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : तब्बल २८ वर्षानंतर बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल , प्रमुख आरोपींची न्ययालयात अनुपस्थिती

Spread the love

बहुचर्चित बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल तब्बल २८ वर्षानंतर आज येणार आहे. या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटीयार, साध्वी रितंभरा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, साक्षी महाराज आणि फिरोजाबादचे तत्कालीन डीएम आर एम श्रीवास्तव यांच्यासहीत ३२ जण आरोपी आहेत. मागच्या सुनावणीत न्यायालयानं निर्णयाच्या सुनावणीवेळी सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. पण आज एकूण सहा जण कोर्टासमोर हजर होणार नसल्याचे वृत्त आहे. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, रामचंद्र खत्री आणि सुधीर कक्कड हे सीबीआय न्यायालयात उपस्थित राहणार नाहीत. या पाचही आरोपींकडून त्यांचे वकील न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. तर मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी आणि उमा भारती व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावणार आहेत. बाबरी प्रकरणात एकूण ४९ आरोपी आहेत. त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

लालकृष्ण आडवाणी ९२ वर्षीचे असल्याने  चालण्या-फिरण्यास असमर्थ आहेत. त्यांची प्रकृतीही सध्या साथ देत नाही. अशावेळी ते न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांचे वकील न्यायालयासमोर प्रार्थनापत्र सादर करू शकतात. सोमवारी उमा भारती करोना संक्रमित असल्याचं समोर आलं होतं. त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे त्यादेखील आज न्यायालयासमोर उपस्थित राहू शकणार नाहीत आडवाणी आणि उमा भारती यांच्याशिवाय मुरली मनोहर जोशी यांचंही वय अधिक आहे त्यामुळे तेदेखील न्यायालयात उपस्थित राहणार नाहीत. आणखी एक आरोपी रामचंद्र खत्री एका दुसऱ्या गुन्ह्यासाठी हरियाणाच्या सोनीपतच्या तुरुंगात बंद आहे त्यामुळे तेदेखील या सुनावणीसाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. याशिवाय कारसेवक सुधीर कक्कड यांनीदेखील उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलंय. यामुळे, न्यायालय आपला निर्णय पुढे ढकलणार की आजच या प्रकरणात आपला निर्णय सुनावणार याची अनेकांना उत्सुकता आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले आहेत. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले, मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता. दरम्यान न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांच्यापैकी कोणीही उपस्थित नसणार आहे.  दरम्यान लालकृष्ण अडवाणी २४ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष सीबीआय कोर्टात आपला जबाब नोंदवला होता. यावेळी त्यांना न्यायाधीशांकडून एकूण १०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्या एक दिवस आधी मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!