Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : HathrasGroupRapeCase : चारही आरोपींचे लिंग कापून आणा , २५ लाखाचे बक्षीस देतो , विश्व हिंदू सेनेच्या नेत्याचा व्हिडीओ

Spread the love

उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मध्यरात्री पीडिताचे अंत्यसंस्कार केल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.  या प्रकरणात आता विश्व हिंदू सेनेचे संरक्षक यांनी हाथरसच्या चारही आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्याला २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी याचा एक व्हिडीओ शेअर करीत उत्तर प्रदेश सरकारवर  निशाणा साधला आहे. विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, देशात मोदी आणि उत्तर प्रदेशात जेव्हा योगी सरकार आलं तेव्हा वाटलं की धर्माचं शासन आलं आहे. मात्र या सरकारमध्ये ब्राम्हण आणि दलितांमधील भाजपचा सदस्य न होणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी असं कधीचं नव्हतं. हे कृत्य करणाऱ्यास बक्षीस देण्यासाठी पसंगी मी माझी संपत्ती विकें , कर्ज काढेन पण बक्षिसाची रक्कम आदा  कारेन. नवभारत टाईम्स ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या व्हिडिओमध्ये अरुण पाठक यांनी पुढे म्हटले आहे की, हाथरसमध्ये जे काही झालं…नराधमांनी मुलीवर बलात्कार केले, आणि आता पीडितेच्या कुटुंबीयांवर पोलीस मानसिक बलात्कार करीत आहेत. उत्तर प्रदेशातील पोलीस जे काही करीत आहे, ते माफ करण्यालायक नाही. योगीच्या पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांचीही वाट पाहिली नाही. मध्यरात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पीडितेच्या आई-वडिलांना शेवटी मुलीचा चेहराही पाहायला मिळाला नाही. विश्व हिंदू सेनेचे संरक्षक यांनी सांगितलं की, हाथरसमधील चारही आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्याला २५ लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा आम्ही केली आहे. अरुण पाठक यांनी म्हटले  आहे की, योगींच्या पोलिसांना जेथे धाडस दाखवायला हवं होते तेथे दाखवलं नाही. जनतेला विनंती आहे की, आता वेळ आली आहे. आता सीमा पार केली आहे, पुन्हा एकदा क्रांती होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!