Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बाबरी मशीद विध्वंस प्रकरण : धक्कादायक निकाल , देशासाठी काळा दिवस : बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी

Spread the love

लखनौ सीबीआय विशेष न्यायालयाने बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात २८ वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयावर एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशासाठी आजचा दिवस हा काळा दिवस, बाबरी मशीद काय जादूने पडली का? – असा सवाल ओवेसींनी उपस्थितीत करताना बॅरिस्टर ओवैसी यांनी म्हटले आहे कि , न्यालयाचा हा निर्णय हा आमच्यासाठी धक्कादायक आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. उमा भारती यांनी ‘एक धक्का और दो…’ म्हटलं हे अवघ्या देशाने पाहिले आणि ऐकले आहे. सीबीआयने आपल्या आरोपपत्रातही असे म्हटले आहे. मग न्यायालयाने आपल्याकडे पुरावाच नाही असा निर्णय दिला,  हा मुस्लिम समाजावर अन्याय आहे.  तसेच , सीबीआय सारख्या संस्थेच्या तपासावर या निकालामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण भाजप, संघ, विश्व हिंदू परिषद, शिवसेनेचा या प्रकरणात हात आहे. हे सर्व जगाला माहित आहे. त्यामुळे आज न्यायालयाचा हा निर्णय देशासाठी काळा दिवस आहे’, असंही ओवेसी म्हणाले. दरम्यान, आज लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. यावेळी साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत १८ आरोपी कोर्टात उपस्थित होते तर अडवाणी यांच्यासह काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी तब्बल 2000 पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. कोर्टाने यावेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत, हा पूर्वनियोजित कट नसल्याचे जाहीर केले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी याचबरोबर उमा भारती यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!