Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapeNewsUpdate : ” माझ्या मुलीला शेवटची हळद तरी लावू द्या …” काळ्याकुट्ट अंधारात आईचा आक्रोश पाषाण हृदयी पोलिसांनी एकलाच नाही ….

Spread the love

देशातील संवेदनहीनतेचा कळस उत्तर प्रदेश पोलिसांनी पार केला आहे . माझ्या मुलीला आमच्या ताब्यात द्या . तिच्या अंगाला हळद लावून तिची अंतिम विदाई तरी मला करू द्या असा आर्त टाहो पीडित मुलीच्या आईने फोडला खरा  पण उत्तर प्रदेश पोलिसांच्या  पाषाण हृदयाला पाझर फुटला नाही. एका माऊलीच्या किंकाळ्याकडे ठार बहिरे झालेल्या पोलिसांनी पीडितेच्या  मृतदेहाला अग्नी देण्याचा निर्लज्ज पराक्रम केला.   हृदयाला पिळवटून टाकणारे हे दृश्य होते. आधी पोलिसांकडे आणि मग पत्रकारांकडे या आईने आपली आशादायी  नजर वळवली पण पत्रकारांचे कॅमेरेही या माऊलीच्या आक्रोशाने सुन्न झाले. हताश पत्रकार पोलिसाला बोलण्याचा प्रयत्न करीत होते परंतु त्यांनी त्यांच्याकडेही पाठ फिरवली.

मंगळवारी मध्यरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात गॅंग रेप पीडितेचा आवाज कायमचा शांत झाला आणि हि बालिकेचा  देह पंचतत्वात विलीन झाला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृतीवरही मोठी टीका  होत आहे आणि सरकारवरही प्रश्नांचा भडीमार होत आहे आणि सरकार चौकशी समितीची घोषणा करून शांत आहे.  पत्रकारांजवळ आपल्या वेदनांना वाट करून  देताना    पीडितेची आई म्हणाली कि , हि माझी शेवटची मुलगी होती. आम्ही स्वप्न   पाहिले होते कि तिचा विवाह आम्ही धुमधडाक्यात करू. हिंदू रितीरिवाजानुसार मुलीला हळद लावून आम्ही अखेरचा निरोप देतो. म्हणून म्हणून आम्ही पोलिसांना विनंती केली कि , आमच्या  मुलीचा मृतदेह आमच्या ताब्यात द्या आणि आमच्या  रिवाजानुसार तिच्यावर अंत्यसंस्कार करू द्या. आता ती  काही परत येणार नाही , पण पोलिसांनी आमची हि अखेरची इच्छा देखील त्यांनी पूर्ण केली नाही.

कुटुंबियांना कुठलीही पूर्वसूचना दिली नाही…धमकावून घेतल्या सह्या

पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार  करण्यात येणार असल्याची कुठलीही पूर्वसूचना पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना दिली नाही. दिल्लीहून कोणालाही न सांगता पोलिसांनी आपले काम रात्रीच्या अंधारात उरकून घेतले. मुलीच्या भावाने सांगितले कि , पोलिसांनी जबरदस्तीने सहमती पत्रावर आमच्या सह्या  घेतल्या त्यामुळे आमचा पोलिसांवर  विश्वास राहिला नाही. आमच्या जीवालाही धोका आहे. अंत्यसंस्कार करताना आम्हाला धक्का बुक्कीही करण्यात आली. अनेक लोकांना घरातून बाहेर येऊ दिले नाही. तर काही लोक भीतीने घराबाहेरच निघाले नाही . इतकी पोलिसांची दहशत झाली आहे.

निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

दरम्यान या प्रकरणावर बोलताना निवृत्त  आयपीएस अधिकारी एन.सी. अस्थाना नवभारत टाईम्सशी बोलताना म्हणाले  कि , पोलिसांची हि कृती ठीक नाही. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला , आरोपींना अटक केली ठीक आहे पण पोलिसांनी हे का केले ? जबरदस्तीने मुलीवर अंत्यसंस्कार का केले गेले ? केस कमजोर करण्याचा त्यांचा हेतू आहे काय ? सफदरगंज रुग्णालयात करण्यात आलेले पोस्टमार्टेम चुकीचे करण्यात आले का ? ते जर चुकीचे झाले असेल तर पुन्हा पोस्ट मार्टेम करण्याचा अधिकारही पोलिसांच्या या कृत्यामुळे तो अधिकारही गमावला आहे. पोलिसांनी हे जाणून बुजून केले आहे का ? असे प्रश्न यातून निर्माण होत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!