Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapeCase : अखेर पंतप्रधान मोदी यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन

Spread the love

देशभरात असांतोषचा उद्रेक झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला असल्याचे वृत्त असून स्वतः मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.  त्यांनी म्हटले आहे कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हथरस प्रकरणाबद्दल चर्चा केली आणि दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जावी, असं म्हटलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारकडून एसआयटी  गठीत करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हाथरसमध्ये तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेतील दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आलीय. हे पथक पुढच्या सात दिवसांत आपला अहवाल देणार आहे. त्वरित न्याय सुनिश्चित करण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे. हाथरस घटनेतील पीडित तरुणीनं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मंगळवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला होता. तिचा मृतदेह रात्रीच हाथरसला पोहचला. पीडितेच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, उत्तर पोलिसांनी जबरदस्तीनं मुलीच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार उरकले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला नाही तसंच तिचा मृतदेह घरीही नेऊ दिला नाही. दिल्लीहून हाथरसमध्ये पोहचल्यानंतर पोलिसांनीच मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकले. ‘पोलिसांनी आमच्याकडून जबरदस्तीनं सहमती पत्रावर स्वाक्षरी करून घेतली आणि अर्ध्या रात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. आम्हाला पोलिसांवर विश्वास नाही तसंच आम्हाच्याही जीवाला धोका आहे’ असा आरोप मृत पीडितेच्या भावानं मीडियाशी बोलताना केलाय.

हाथरस पोलिसांचं स्पष्टीकरण

प्रकरणानं जोर धरल्यानंतर हाथरस पोलिसांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलंय. ‘मृत पीडितेची जीभ कापण्यात आली होती, डोळे फोडण्यात आले होते तसंच पाठीचा मणका तोडण्यात आला होता तसंच तसंच पोलिसांनी पीडित कुटुंबीयांच्या परवानगीविनाच मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार केले, अशा खोट्या बातम्या सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात येत आहेत. हाथरस पोलीस या असत्य आणि भ्रामक बातम्यांचं खंडण करत आहे’ असं पोलिसांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!