Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही कोरोनाने गाठले

Spread the love

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  Vice President of India च्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती ट्विट करण्यात आली आहे. आज सकाळी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना करोनाची लक्षणं नाहीत तसेच त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. व्यंकय्या नायडू यांची पत्नी उषा यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना स्वतःला विलीगीकरणात ठेवलं आहे. उपराष्ट्रपती सचिवायलाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्यंकय्या नायडू यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची रुटीन करोना टेस्ट अर्थात नियमित करोना चाचणी आली. ज्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती असल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

ओम बिर्ला यांना पितृशोक

दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे वडील श्रीकृष्ण बिर्ला यांचं निधन झालं आहे. श्रीकृष्ण बिर्ला हे ९२ वर्षांचे होते. २९ सप्टेंबर रोजी कोटा या ठिकाणी त्याचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. श्रीकृष्ण बिर्ला यांच्या पार्थिवावर बुधवारी म्हणजेच ३० सप्टेंबरला सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. श्रीकृष्ण बिर्ला सरकारी कर्मचारी होते. ते सेल्स टॅक्स विभागातून सेवा निवृत्त झाले होते. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!