Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : ताजी बातमी : राज्यात उपचारामुळे घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, दिवसभरात ४३० मृत्यू

Spread the love

गेल्या 24 तासांत दिवसभरात 19,212 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आलं तर  14,976 नवीन रुग्ण दाखल झाले. राज्यात आतापर्यंत 10,69,159 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पण अद्याप  2,60,363 रुग्ण उपचाराधीन आहेत. दरम्यान आज दिवसभरात झालेल्या मृत्यूंची संख्या 430 नोंदवण्यात आली आहे. दरम्यान  उपचाराधीन असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे, त्यानंतर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांचा क्रमांक आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे या तीनही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत नवीन रुग्ण सापडण्याचा वेग तुलनेने कमी झाला आहे. मुंबईत पुन्हा एकदा रुग्णवाढीचा दर आटोक्यात ठेवण्यात यश आलं आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या ताजी आकडेवारी अशी आहे.  अॅक्टिव्ह रुग्ण  – 2,60,363 । 24  तासांतली वाढ – 14,976 । 24 तासांतले मृत्यू – 430 । एकूण रुग्णसंख्या – 1366129 । एकूण मृत्यू – 36181 । मृत्यूदर – 2.65% । रिकव्हरी रेट – 78.26%

दरम्यान देशात अद्यापही कोरोनाचा धोका कायम असून रुग्ण बरे होण्याच्या दारात सुधारणा होत असली तरी रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने  चिंता व्यक्त केली आहे. त्यातचं मुंबईसह दिल्लीतील सीरो सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.  दिल्लीत दुसऱ्या टप्प्यातील सीरो सर्व्हेमधून 29.1 टक्के कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे. पहिल्या सर्वेक्षणातून हा आकडा 23.5 टक्के इतका होता, अशी माहिती ICMR ने दिली आहे. सीरो सर्व्हेमधून देशावर अद्यापही कोरोनाचा धोका असल्याची माहिती समोर येते, असे आराग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

देशात करण्यात आलेल्या पहिल्या सीरो सर्व्हेक्षणात  73 टक्के लोकसंख्येवर कोरोना संसर्ग होण्याचा अंदाज होता, आता हे प्रमाण 7.3 टक्के आहे. देशात 7 कंपन्या रेमिडेसिवीरची निर्मिती करीत आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्वत्र सहजपणे उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सरकारकडे कोरोना लशीसाठी 80 हजार  कोटी रुपयांच्या बजेटवर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 80 हजार कोटी रुपयांची गरज लागेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारत सरकारने लशीबाबत डॉ. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. यामध्ये लशीबाबत लोकांमध्ये प्राथमिकता देण्याबाबत चर्चा झाली. त्याशिवाय बजेटचाही अंदाज लावण्यात आला आहे. त्यातच दिल्लीच्या दुसऱ्या टप्प्यात सीरो सर्वेमध्ये 29.1 टक्के कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे. पहिल्या सर्व्हेमध्ये हा आकडा 23.5 टक्के होता, अशी माबिती आयसीएमआरने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!