Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोरोनमुक्त मंत्री मुश्रीफ यांची जंगी मिरवणूक !! गाडीवर केला फुलांचा वर्षाव , नियमांचाही पडला विसर …. !!!

Spread the love

कोरोनातून बरे होऊन आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये आज जल्लोषी स्वागत झाले. गाडीतून उतरताच मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामदैवत गैबी देवस्थानाचे दर्शन घेतले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गैबी चौकात मंत्री मुश्रीफ यांच्या समवेत लहान मुलांच्या हस्ते हवेत तिरंगी फुगे सोडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून रस्त्याच्या दुतर्फा उभारलेल्या माता-भगिनी व नागरिकानी मंत्री मुश्रीफ यांच्या गाडीवर फुलांचा अक्षरशः वर्षाव केला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या कुटुंबियांच्या वतीने गैबी देवस्थानाला गलेफ घालण्यात आला. तसेच अवधूत गोरे रा. तमनाकवाडा व संतोष कांबळे रा. सोनगे या दोघा युवकांनी बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून गैबी चौकापर्यंत दंडवत घातला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा व चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच मुख्य बाजारपेठेतील चौकांमध्ये नागरिकांच्या वतीने त्यांच्यासह गाडीवर फुलांचा वर्षाव होत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांनी ट्विट करून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. ‘माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच करोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!