Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraCurrentUpdate : दिलासादायक : नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज सर्वाधिक , मृत्यूच्या संख्येतही झाली मोठी घट

Spread the love

गेल्या २४ तासात  ११ हजार ९२१ नवीन रुग्ण आढळून आले असून राज्यात आज एकाच दिवशी १९ हजार ९३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख ४९ हजार ९४७ इतकी झाली आहे. त्याचबरोबर राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे. आज राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७. ७१ इतके झाले आहे. राज्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आज दिवसभरात ११ हजार ९२१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १३ लाख ५१ हजार १५३ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६६ लाख २२ हजार ३८४ चाचण्यांपैकी १३ लाख ५१ हजार १५३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान आज दिवसभरात १८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनामृतांचा आकडा ३५ हजार ७५१ इतका झाला आहे. राज्यात सध्या २ लाख ६५ हजार ०३३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील मृत्यूदर २. ६५ टक्के इतका आहे. राज्यात सध्या १९ लाख ७५ हजार ९२३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, २९ हजार९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर  देशात आजपर्यंत करोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एक दिवसात ९० हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!