Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : पंकजा मुंडे , विनोद तावडे , विजया रहाटकर राष्ट्रीय कार्यकारिणीवर , खडसे पुन्हा बाहेरच

Spread the love

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या या यादीत महाराष्ट्रातून माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची देखील वर्णी लागली आहे. त्याचबरोबर सुनील देवधर, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जमाल सिद्दीकी यांची विधानसभा निवडणुकीच्या वेळी विनोद तावडे यांना तिकिटच मिळाले नव्हते. तर पंकजा मुंडे या निवडणूक हरल्या होत्या. दरम्यान भाजपातले नाराज नेते एकनाथ खडसे यांना मात्र यादीत कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. यामध्ये कर्नाटकातील भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. रमन सिंह, मुकुल रॉय, अन्नपूर्णा देवी, बैजयंत जय पांडा यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर तेजस्वी सूर्या यांची भाजपाच्या युवा मार्चा अध्यक्षपदी आणि राजकुमार चहर यांची किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, सीटी रवी यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये हे बदल करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!