Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : चर्चेतली बातमी : दीपिकाने मान्य केले कि , चॅट तिचेच आहेत पण ड्रग विषयी केला असा खुलासा…

Spread the love

दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चालू आहे एनसीबी कार्यालयात चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूच्या चौकशीत उघडकीस आलेल्या ड्रग कनेक्शनमुळे  सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींची चौकशी सुरू आहे. यामध्ये आता एक अत्यंत धक्कादायक बाब समोर येत आहे. याप्रकरणी नाव समोर आलेली बडी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ड्रग चॅटबाबत कबुली दिली आहे. मात्र आपण ड्रग घेत नाही असा खुलासा केला.  दीपिकाच्या म्हणण्यानुसार २०१७ चे हे चॅट होते, ज्यामध्ये कोको क्लबमध्ये भेटण्याबाबत भाष्य करण्यात आले होते. दीपिकाने या गोष्टी मान्य केल्या असल्या तरी ड्रग्जबाबत तिने अजून कोणते स्टेटमेंट दिलेले नाही. दीपिकाने असे म्हटले आहे की, आम्ही एखादी सिगरेट पितो पण ते खूप कॉमन आहे.

दरम्यान दीपिकाने तिच्या मॅनेजर करिश्माबरोबर हे चॅट केले होते. त्या करिश्माची देखील वेगळी चौकशी सुरू आहे. दोघींना देखील वेगळ्या खोल्यांमध्ये बसवून चौकशी करण्यात आली. दीपिकाने हे मान्य केले आहे की जे ड्रग चॅट समोर आले आहे ते तिचेच आहे. पण चॅटमधून तिने Doob मागितले असल्याचे तिने म्हटले आहे. तिने असे म्हटले आहे की Doob म्हणजे ते एक प्रकारची सिगारेट पितात. मात्र तिने अनेक प्रश्नांची उत्तरं देण टाळलं आहे. एनसीबीच्या प्रश्नांचे समाधान होईल अशी कोणतीही उत्तर दीपिकाने दिली नाहीत, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून मिळते आहे. तू ड्रग्ज घेते का असे विचारल्यानंतरही दीपिकाने नाही असे उत्तर दिले आहे.

दीपिका पादुकोणची चौकशी ५ जणांच्या टीमकडून करण्यात आली. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचीही वेगळी चौकशी केली गेली. दोघींची समोरासमोर चौकशी देखील झाली. करिश्माला याप्रकरणी काल देखील काही प्रश्न विचारण्यात आले होते. याप्रकरणी आज सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची देखील चौकशी होत आहे. दोघीही जणी एनसीबी कार्यालयामध्ये दाखल झाल्या आहेत. दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणचा करण जोहरच्या पार्टीतील व्हिडीओ देखील यावेळी पुन्हा व्हायरल होत आहे. २०१९ मध्ये करण जोहरने एका पार्टीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावेळी देखील हा व्हिडीओ खूप चर्चेत आला होता. त्याच्या राहत्या ठिकाणी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या व्हिडीओत दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा, अर्जून कपूर, विकी कौशल, रणबीर कपूर आणि इतर काही कलाकार दिसत होते. दरम्यान त्यावेळी देखील हे कलाकार पार्टीत ड्रग घेत असल्याचे दिसत असले तरी करण जोहरने त्याचा इन्कार केला आहे.

मीडियाने दिलेल्या माहितीनुसार ड्रग्ज प्रकरणी दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याचीही  चौकशी होण्याची शक्यता आहे. २८ जुलै २०१९ रोजी करण जोहरच्या घरी ड्रग्ज पार्टी झाल्याचा संशय आहे. त्यामुळे एनसीबी करणची चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, ‘माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते’, असं स्पष्टीकरण करण जोहरने दिलं आहे. करणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!