Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MubaiNewsUpdate : जावेद अख्तर यांनी ड्रग चौकशीला म्हटले ” मूर्खपणा …जे ड्रग्ज घेतात त्यांना दुरुनही ओळखता येतं….”

Spread the love

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची नावं पुढे येत असून एनसीबीकडून त्यांची चौकशी केली जात आहे. प्रसिद्ध सिने गीतकार आणि लेखऱ जावेद अख्तर यांनी बॉलिवूडची बाजू मांडली असून आरोग्याची इतकी काळजी घेणाऱ्या या सेलिब्रेटींनी ड्रग्जचं व्यसन आहे म्हणणं मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

ड्रॅग चौकशी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना जावेद अख्तर पुढे म्हणाले  की, “विषय बदलत चालले आहेत, पण फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही. जिथून विषय सुरु झाला होता तो सगळे विसरले. त्यानंतर आलेले विषयही विसरले, कारण त्यात सिद्ध करण्यासाठी काहीही सापडलं नाही. फिल्म इंडस्ट्रीत सगळे ड्रग्जचं व्यसन असणारी लोकं असल्याचं बोललं जात आहे. मी १९६५ पासून इंडस्ट्रीत आहे. आजची पिढी जितकी आरोग्याची काळजी घेतं तेवढं कोणीच नव्हतं”. “जुने चित्रपट तुम्ही पाहिले तर हिरोईनचं वजन थोडं जास्त आहे, हिरोचं पोट पुढे आलं आहे. पण आजच्या मुला-मुलींना पाहिलं तर ते फिजिकली किती फिट आहेत. दिवसातले दोन ते तीन तास ते व्यायाम करत असतात. एकदम स्लीम, फिट, एकही फॅट जास्त नाही. हे तुम्हाला ड्रग्ज व्यसनी वाटतयात. जे ड्रग्ज घेतात त्यांना दुरुनही ओळखता येतं. ही आजकालची मुलं एवढी फिट आहेत की त्यांना ड्रग्जचं व्यसन आहे म्हणणं मूर्खपणाचं आहे,” असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!