Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : प्रभावी लस येण्याआधी जगभरात होऊ शकतात २० लाख मृत्यू , WHO च्या अधिका-याने दिलासावधानतेचा इशारा

Spread the love

जगात सर्वत्र कोरोनाचा कहर चालू असताना कोरोनावर प्रभावी लस येण्याआधी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती  जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. तूर्तास तरी ही शक्यताच आहे मात्र ही एक दुःखद बाबच आम्ही मानतो आहोत. सध्याच्या घडीला जगभरात करोनाची बाधा झालेले रुग्ण हे ३ कोटी २० लाखांपेक्षा जास्त आहेत. अशात करोनामुळे २० लाख मृत्यू जगभरात होऊ शकतात अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. रॉयटर्सने या संदर्भातले वृत्त दिले असून यु एन  एजन्सीच्या इमर्जन्सी प्रोग्रामचे प्रमुख माईक रेयान यांनी ही भीती बोलून दाखवली आहे. लॉकडाउनची बंधनं शिथील झाल्यानंतर लोकांनी घरांमध्ये ज्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली त्यामुळेही संक्रमण वाढलं असंही रेयान यांनी म्हटलं आहे.

गेल्या  ९ महिन्यांमध्ये कोरोना व्हायरसची बाधा झाल्याने  ९.९३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे अशी माहितीही  माईक रेयान यांनी दिली. यामुळे येत्या काळात लस येण्याआधी ही संख्या दुप्पट होईल म्हणजेच प्रभावी लस येण्याआधी २० लाख मृत्यू होऊ शकतात ही शक्यता अधिक आहे असंही रेयान यांनी म्हटलं आहे. कोरोनाची बाधा होऊन आजवर अमेरिकेत २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात ९३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त, रशियात २० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत ७० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहे तर भारतात ही एकूण रुग्णांची संख्या ५९ लाखांवर पोहचली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!