Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन

Spread the love

भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते . गेल्या महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. सिनेसंगितात बालसुब्रमण्यम यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. त्यांचं नाव अत्यंत अदबीनं घेतलं जात होतं. त्याच्या आवाजाची वेगळीच जादू प्रक्षेकांनी आणि रसिकांनी अनुभवली आहे. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा अशा अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत.

प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या ९० च्या दशकातील  चित्रपटांमध्ये बालसुब्रमण्यम यांनीच प्रार्श्वगायन केलं होतं. त्यामुळं सलमान खानचा आवाज म्हणूनही त्यावेळी त्यांना म्हटंल जात होतं. केवळ गायन नव्हे तर अभिनयाची देखील बालसुब्रमण्यम यांना प्रचंड आवड होती. हम से है मुकाबला या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. इलया राजा, ए.आर. रेहमान, नदीम-श्रवण, जतीन ललीत आदी अनेक संगीतकारांकडं त्यांनी काम केलं आहे. हिंदीसह तमीळ, तेलुगु, मल्याळम आदी भाषांत चाळीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!