Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : कोरोना पॉझिटिव्ह प्रिया गायकवाड गेली कुठे ? मुलीला शोधण्यासाठी आईचे आमरण उपोषण , प्रशासनही झाले निरुत्तर…. !!

Spread the love

“माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जीवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अँब्यूलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हात वर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला न्याय पाहिजे आहे. ”  : प्रिया गायकवाड यांच्या आई रागिणी सुरेंद्र गमरे


यावेळी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले की, करोडो रूपये खर्च करून आणि ठिकठिकाणी सीसीटिव्ही लावून उभारण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक आहे. अशा प्रकारे याठिकाणाहून एखादी व्यक्ती बेपत्ता होते, हा यंत्रणेतील दोष असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच पालकमंत्री, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालून या माऊलीला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.

गेल्या 27 दिवसांपासून  33 वर्षीय युवती बेपत्ता असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील शिवाजीनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या भव्य कोव्हिड सेंटरमधून प्रकार समोर आला आहे. आपल्या बेपत्ता मुलीच्या शोधासाठी  मुलीची आई उपोषणाला बसली आहे. गेल्या 27 दिवसांपासून आपली मुलगी प्रिया कुठे आहे हा एकाच प्रश्न तिने प्रशासनाला विचारला असून अद्याप या प्रश्नाला गांभीर्याने घेण्यास ना प्रशासन तयार आहे ना सरकार !!  दरम्यान आपल्या मुलीचा शोध लागेपर्यंत आईने उपोषण करण्याचा निर्धार केला असून  रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डांबले आणि सुवर्णा  डंबाळे यांनी मुलीचा तपास लागत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा इशारा दिला आहे.

प्रिया गायकवाडची आई पत्रकारांशी बोलताना म्हणाली कि , “आमची मुलगी 29 ऑगस्ट रोजी दवाखान्यात कोरोना उपचारासाठी भरती झाली होती. 30 तारखेला आम्ही काळजीपोटी रूग्णालयात आलो तर 49 नंबर बेडवर उपचार सुरू असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. तसंच ती बरी झाल्यानंतर आणि तिचा क्वारन्टाईन पिरीयड संपल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू असं सांगितलं गेलं. 13सप्टेंबरला आम्ही रूग्णालयात गेलो असतो तिला उद्या डिस्चार्ज देणार आहोत, असं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र ती आणखीही आमच्या नजरेस पडलेली नाही”.

“आमची मुलगी नेमकी आहे कुठे?”, असा आर्त सवाल मुलीचे कुटुंबीय प्रशासनाला वारंवार विचारत आहेत. प्रशासन काही उत्तर देत नसून मुख्यमंत्री साहेब माझी मुलगी आम्हाला मिळवून द्या, अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे. सुरवातीला काहीही न बोलणाऱ्या पुणे महापालिका प्रशासनाने मुलीच्या घरच्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यावर चौकशी केली जाईल, असे ठरलेले उत्तर दिले आहे. याबाबत बोलताना पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल म्हणाल्या, “आधी इकडची सर्व्हिस लाईफलाईन संस्थेकडे होती. त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. तसंच त्यांना संबंधित रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल”.

पुण्याच्या याच बहुचर्चित जम्बो कोविड सेंटरमध्येच काही दिवसांपूर्वी पत्रकार पांडुरंग रायकर यांना याच कोव्हिड सेंटरमधून कार्डियाक अ‌ॅम्बुलन्स न मिळाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. ते नेमके कुठल्या बेडवर आहेत याचाही पत्ता रुग्णालयाने त्यांना दिला नव्हता तसेच त्यांच्या कुटुंबियांना भेटही दिली नव्हती. असाच प्रकार प्रिया गायकवाडच्या बाबतीतही  झाला असल्याचे निदर्शनास येत आहे.  पुण्यात जम्बो कोव्हिड सेंटर सुरू झाल्यापासून येथील आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे रूग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रूग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या वाढत्या तक्रारींमध्ये भर पडत आहे. शासन-प्रशासन येथील परिस्थिती आता सुधारली आहे असे सांगत असले तरी हे संतापजनक प्रकार घडत आहेत. दरम्यान पुण्यातील याच जंबो कोव्हिड सेंटरमधून उपचारासाठी दाखल करण्यात आलेली ३३ वर्षीय करोना पॉझिटिव्ह तरुणी  बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ माजली आहे.

तिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता झालेल्या तरुणीला ससून रुग्णालयातून जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले होते. या रुग्ण महिलेवर उपचार सुरु असल्याचं कोव्हिड सेंटरमधून सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, बरी झालेल्या आपल्या तरुणीला जंबो कोव्हिड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या तिच्या आईला, ‘तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे.

माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून रुग्णवाहिकेतून कोव्हिड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हात वर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला न्याय पाहिजे आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया बेपत्ता तरुणीच्या आईनं व्यक्त केली आहे.

रिपब्लिकन युवा मोर्चाचाही आंदोलनात सहभाग

जंबो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड या३३ वर्षीय महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत बेपत्ता महिलेच्या आई रागिणी सुरेंद्र गमरे जंबो कोविड सेंटर येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या उपोषण आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे हेदेखील उपोषणाला बसले आहेत. याप्रसंगी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डंबाळे, काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजित यादव, भिमछावा संघटनेचे संस्थापक श्याम गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे, विवेक बनसोडे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अश्विन दोडके, संतोष डंबाळे, अजय लोंढे,संतोष घोलप, स्नेहल कांबळे, अमोल डंबाळे राजश्री सोनवणे सामाजिक कार्यकर्ता अनिताताई सावळे,आदी कार्यकर्त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
आजच्या आंदोलनाची दखल घेत मुंबई येथून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष माननीय चित्राताई वाघ या आंदोलनस्थळी येऊन त्यांनी आंदोलकांची भेट घेतली व सदर बेपत्ता महिलेच्या आईचे सविस्तर म्हणणे ऐकून घेऊन त्यांना आधार देऊन या लढ्यात आपण सोबत आहोत असा विश्वास दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!