Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : एनसीबीकडून ड्रग माफियांवर धाडीचे सत्र , दीपिका पादुकोणची उद्या हजेरी

Spread the love

बॉलिवूड अभिनेता  सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एका बाजूला सुरु आहे तर दुसऱ्या बाजूला  रिया चक्रवर्तीच्या निमित्ताने सिनेसृष्टीतील ड्रग कनेक्शन उघड होत आहे. दरम्यान या माहितीनुसार मुंबईत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दलालांवर छापे टाकण्याची मोहीमच उघडली आहे. एकीकडे एनसीबीची एक टीम बी- टाउनमधील सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे एनसीबीची दुसरी टीम मुंबईतील वेगवेगळ्या भागांवर छापे टाकून ड्रग्ज डीलरला ताब्यात घेऊन कसून  चौकशी करीत आहेत. दरम्यान एनसीबीचे एक विशेष तपास पथक (एसआयटी) जे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची स्वतंत्ररित्या चौकशी करत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, दिवंगत अभिनेता सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंत आणि इतरांना अटक केल्यानंतर बरीच धक्कादायक माहिती एनसीबीला मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एनसीबीची आणखी कटकट नको म्हणून अमली पदार्थ पुरवठ्याच्या प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनी जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जांवर काल बुधवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता होती, परंतु पावासामुळे कोर्टाचं कामकाज आज बंद ठेवण्यात आलं होतं त्यामुळं या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. दरम्यान सुशांतसिंहचे मदतनीस दिपेश सावंत व सॅम्युअल मिरांडा आणि अमली पदार्थांचा कथित विक्रेता अब्देल बसित परिहार यांनीही जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जांवरील सुनावणी न्या. सारंग कोतवाल यांनी २९ सप्टेंबरला ठेवली आहे. त्यामुळे रिया व शौविकच्या अर्जांवरही त्याच दिवशी सविस्तर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमली पदार्थांच्या विक्रीचा आरोप असलेला कथित विक्रेता झैद विलात्रा याच्या जामीन अर्जावर सोमवारी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी एनसीबीने उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितल्याने न्यायमूर्तींनी त्यावर पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी ठेवली. बुधवारी समन्स मिळाल्यानंतर फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आज गुरुवारी एनसीबीच्या चौकशीला सामोरी गेली. रकुलप्रीत सिंग, दीपिका पादुकोण उद्या २५ तारखेला एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी जातील. तर २५ सप्टेंबरला सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!