Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : कंगना राणावतच्या कार्यालय तोडफोडीची मुंबई हाय कोर्टात सुनावणी , आज काय झाले ?

Spread the love

बहुचर्चित कंगना राणावतच्या बंगल्यावरील कारवाईच्या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आलेले मुंबई महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाटे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितली आहे. ही परवानगी  देताना  प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागणाऱ्या लाटे यांच्या वकिलांना  ‘इतर वेळी तुम्ही तत्पर असता आणि जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा मुदत मागता,’ असं न्यायालयानं सुनावलं. या प्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे.

कंगना राणावतने  आपल्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं  केलेली कारवाई बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी आपल्याला नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी  करीत  उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळं माझ्या बंगल्यावर कारवाई केली गेली असं म्हणत तिनं राऊतांना या प्रकरणात ओढलं आहे. तसंच, तोडकामाची कारवाई करणारे सहाय्यक आयुक्त लाटे यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून न्यायालयानं स्पष्टीकरण मागवलं होतं.

मुंबई हाय कोर्टाचे न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढं आज या प्रकरणाची पुढील कार्यवाही झाली. ‘संजय राऊत हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. त्यामुळे हायकोर्टाने त्यांना नंतर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची परवानगी दिली. मात्र, बंगला अंशतः तोडलेल्या अवस्थेत असल्याने आणि पावसाळा सुरू असल्याने सुनावणी अधिक लांबवू शकत नाही, असे बजावत हायकोर्टाने उद्या याचिकादारांच्या वकिलांना युक्तिवाद सुरू करण्यास परवानगी दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!