Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : गुजरात : दोन मोठ्या कारवाया , एका धाडीत एक कोटीचे ड्रग तर दुसऱ्या धाडीत एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त

Spread the love

गुजरातमध्ये  एटीएसनं केलेल्या एका मोठ्या कारवाईत चलनातून बाद झालेल्या एक कोटीच्या जुन्या नोटांचा मोठा साठा जप्त केला तर दुसऱ्या एका घटनेत गुजरात पोलिसांनी एक कोटी रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले . यापैकी एका घटनेत गांधीनगर येथून चलनातून  बाद झालेल्या एक हजार व पाचशेच्या या ११ हजार ९९ नोटा जप्त केल्या असून, त्यांचं एकूण मूल्य ९९.४ लाख म्हणजे जवळपास एक कोटी रुपये आहे. गुजरात एटीएसनं कारवाईनंतर घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

जुन्या नोटा प्रकरणातील आरोपी मनिष संघांनी (पटेल, वय ४२) हा मोरबी जिल्ह्यातील हळवद तालुक्यातील घनश्यामगढ येथील रहिवाशी असून त्याच्या  कारमध्ये या नोटा सापडल्या आहेत. गांधीनगरमधील सेक्टर २८मध्ये एटीएसनं ही कार पकडली. त्यानंतर तपासणी केली असता, त्यात चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा सापडल्या. तब्बल ११ हजार ९९ नोटा असून, त्यांचं एकूण मूल्य ९९.४ लाख रुपये इतकं आहे. यापूर्वी जुलै महिन्यात एटीएसनं अशीच एक कारवाई केली होती. २९ जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईत एटीएसनं दोन जणांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून ४ कोटी ७६ लाख रुपये मूल्य असलेल्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. गोंध्रातील पंचमहलमध्ये ही कारवाई करण्यात आली होती.

दुसरी मोठी कारवाई…

दरम्यान गुजरातमधील सूरत शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून जवळपास १.९ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये मेफेड्रोन आणि गांजा होता. सूरतचे पोलीस आयुक्त अजय तोमर यांनी सांगितले की, मंगळवारी विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यात १.३ कोटी रुपये किंमतीचे मेफेड्रोन आणि ५६ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीकडे १. ०१ कोटी रुपये किंमतीचे १०११.८२ ग्रॅम एमडी आढळले आहे. तसेच पुना परिसरात एका शॉपिंग सेंटरवर केलेल्या छापेमारीत ३० लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी संकेत शैलेशभाई असलालिया याला अटक केली आहे.  शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती. त्याआधारे वारछा येथे चारचाकी वाहन अडवले. त्यात पावणे दोन लाख रुपये किंमतीचे एमडी सापडले. बंटी पटेल असे वाहनचालकाचे नाव आहे. तर गुन्हे शाखेने ओडिशाहून सूरतला येणाऱ्या ट्रकमधून ५६ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. सूरत पोलीस एनसीबीला ही माहिती देणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!