Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : कोरोना काळात एकीकडे खायचे वांधे तर दुसरीकडॆ सर्रास होतेय अंमली पदार्थाची विक्री , पुण्यात साडेसहा लाखाचा गांजा जप्त

Spread the love

कोरोनाकाळात एकीकडे लोकांच्या हाताला काम नसल्याने अनेकांचे खायचे वांधे झाले आहेत तर दुसरीकडे ज्यांच्याकडे अमाप पैसे आहे त्यांची दारू , ड्रग मध्ये पैशाची मोठी उधळपट्टी सुरु आहे . दोन दिवसनपूर्वी बारामतीमध्ये लाखो रुपयाचा गांजा पकडण्याची कारवाई होत नाही तोच ,  पुण्यातील हिंजवडीतील आयटी हबमध्येही  ६ लाख  ४० हजार किलो रुपयांचा तब्बल २५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सध्या देशभरात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून जोरदार कारवाया केल्या जात आहेत. या प्रकरणात अमली पदार्थ पथकाने सापळा रचून तरुणाला  एका अटक केली असून या तरुणाचे नाव योगेश्वर गजानन फाटे (२३)  असे आहे . तो  गोखलेनगर पुणे  एथिल रहिवाशी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी फेज २ येथे एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगेत २५ किलो गांजा सापडला असून त्याची किंमत तब्बल ६ लाख ४० हजा रुपये असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शाकिर जेनेडी आणि संदीप पाटील यांच्या पथकाने केली आहे. लोकसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!