Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : भिवंडीतील ” त्या ” इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ३९ वर

Spread the love

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली होती. त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झालं होतं. आज सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेतील मृतांची संख्या ३९ वर पोहचली आहे.  एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेतील सर्व मृतांची ओळख देखील पटवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आजखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार सुमारे ४५ वर्षे जुन्या या इमारतीत ४० कुटुंबं राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती. जिलानी इमारत दुर्घटनाप्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती -३ साहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!