Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ड्रग प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Spread the love

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांना मुंबई सत्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडी वाढवून दिली आहे. १४  दिवसांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आले असताना  रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मैनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंत आणि ड्रग्ज पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांना ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान मंगळवारी रिया आणि शौविक चक्रवर्ती यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच यावर सुनावणी होणार आहे. याप्रकरणात दिपेश सावंत, सॅम्युअल मिरांडाच्या याचिकेवर २९ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी होणार आहे.

दरम्यान एनडीपीएस कलमाखाली या सर्वांवर विविध आरोप लावण्यात आले आहेत. रिया चक्रवर्तीची रिमांड जरी एनसीबीनं मागितली नसली तरी, ‘आमचा तपास अजून संपलेला नाही’ असं एनसीबीच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आलं. तसेच रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यावर ड्रग्जचा व्यवसाय केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसेच इतरांचा या संपूर्ण प्रकरणात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे या कलमांअंतर्गत कोर्टानं त्यांना जामीन देऊ नये असा दावा एनसीबीच्यावतीनं विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी कोर्टात केला.

अमली पदार्थविरोधी पथक(एनसीबी)च्या विशेष पथकाने शोविक, मिरांडा आणि दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अंमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले होते. अखेर याप्रकरणात मंगळवारी एनसीबीकडून ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली रियालाही अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयानं रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तिचा जामीन अर्जही फेटाळून लावला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!