Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationMaharashtra : सोलापूर बंदला सुरुवात , जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Spread the love

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती आणि राज्य सरकारची भूमिका यावरून राज्यातील मराठा समाजात मोठा असंतोष आहे. दरम्यान आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने   जिल्हा बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे.

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, माढ्यातील तरुणांनी भल्या पहाटेच एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी माढा शहर दणाणून सोडलं आहे. त्यामुळे जिल्हाभरात आज दिवसभरात कशा पध्दतीने हे आंदोलन पार पडतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज आंदोलन करणार आहे. कोल्हापुरातही आज पुन्हा मराठा समाजाचे आंदोलन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे आंदोलन करत राज्य सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज बारावा दिवस आहे. सकल मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आंदोलन न करण्याबाबत पोलीसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!