CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : सलग चौथ्या दिवशी कोरोनमुक्त रुग्णांचा उच्चांक कायम , ३२ हजार रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात  राज्यात  सलग चौथ्या दिवशी तब्बल ३२ हजार ०७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंतचा हा एकाच दिवसातील करोनामुक्तांचा नवा उच्चांक ठरला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढून ७४.८४ टक्क्यांवर गेले असून महाराष्ट्राच्या दृष्टीने हि अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रिकव्हरी रेट सातत्याने वाढत असल्याने तो सरकार आणि आरोग्य यंत्रणांना खूप मोठा दिलासा ठरला आहे. एकीकडे करोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना आज मृत्यूचे प्रमाण आणि नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गेले काही दिवस २० हजारावर दैनंदिन रुग्णसंख्या वाढ होती. तो आकडा आज १५ हजारांपर्यंत खाली आहे. आज दिवसभरात १५ हजार ७३८ नवीन रुग्णांची भर पडली तर राज्यात ३४४ रुग्ण करोनामुळे दगावले.

दरम्यान राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची (अॅक्टिव्ह रुग्ण) संख्या देखील कमी होऊन २ लाख ७४ हजार ६२३ इतकी झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५९ लाख १२ हजार २५८ नमुन्यांपैकी १२ लाख २४ हजार ३८० नमुने पॉझिटिव्ह ( २०.७१ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख ५८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३५ हजार ५१७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील मृत्यूदर सध्या २.७ टक्के एवढा आहे. राज्यात गेले चार दिवस सातत्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उच्चांक नोंदवत आहे. शुक्रवारी राज्यात २२ हजार ७८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले होते. त्यानंतर शनिवारी राज्यात २३ हजार ५०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रविवारी हा आकडा वाढून २६ हजार ४०८ वर पोहचला. तर आज तब्बल ३२ हजार ०७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत व नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) काल ७३.१७ टक्के होते ते आज ७४.८४ टक्के झाले आहे.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.