Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : MarathaReservation : पोलीस भरतीची प्रक्रिया पाच -सहा महिने चालेल , मराठा समाजावर अन्याय होणार नाही : अनिल देशमुख

Spread the love

मराठा आरक्षणावर सर्वोच्च  न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्य सरकारकडून उत्तरे देण्यात येत आहेत. तरीही समाजाची आंदोलने कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत . दरम्यान  राज्य शासनाने घोषित केलेल्या साडेबारा हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही. मराठा समाजातील १३ टक्के तरुणांना यात संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन गृहमत्री अनिल देखमुख यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख म्हणाले कि ,  “साडे बारा हजार भरती करता किमान २५ लाख अर्ज येतील आणि संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी किमान पाच ते सहा महिने लागणार आहेत. मराठा समाजातील १३ टक्के तरुणांना यामध्ये संधी मिळणार आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका राहणार आहे.”

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर राज्यसरकारने राज्यात पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे  मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान मंत्रिमंडळानंही या निर्णयाला मंजुरी दिली असल्याने हि भरती तत्काळ स्थगित करावी अशी मागणी होत आहे . खा . छत्रपती संभाजी राजे यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन पोलीस भरतीला विरोध केला आहे .  या पत्रात संभाजी राजे यांनी “मराठा समाजाच्या १३ टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे,” असे म्हटले आहे . या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मराठा समाजाला आश्वस्त करताना समाजावर अन्याय होणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!