Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : नितीन राऊत , हसन मुश्रीफ पाठोपाठ बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण

Spread the love

काल नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांना कोरोनाची  लग्न झाल्यांनतर राज्याचे आणखी एक मंत्री बच्चू कडू यांनाही  करोना संसर्गाची लागण झाली आहे. कडू यांनीच याबाबत सोशल मीडियातून माहिती दिली आहे. राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करोना चाचणी करून घेतली असता या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत कडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी’, असे आवाहन ट्विटद्वारे कडू यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींना करोनाचा सामना करावा लागला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अस्लम शेख, संजय बनसोडे, अब्दुल सत्तार, सुनील केदार, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे यांना करोनाने गाठले तर प्रकाश सुर्वे, मुक्ता टिळक, वैभव नाईक, मकरंद पाटील, किशोर जोरगेवार, ऋतुराज पाटील, पंकज भोयर, माणिकराव कोकाटे, सुनील टिंगरे, किशोर पाटील, यशवंत माने, मेघना बोर्डीकर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, रवी राणा, चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, अतुल बेनके, अभिमन्यू पवार, कालिदास कोळंबकर, माधव जळगावकर, महेश लांडगे, मोहन हंबरडे, मंगेश चव्हाण, गीता जैन, सरोज अहिरे, अमरनाथ राजूरकर तसेच विधान परिषद सदस्य गिरीश व्यास, सुजितसिंह ठाकूर, नरेंद्र दराडे आणि सदाभाऊ खोत यांनाही करोनाचा सामना करावा लागला. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी २० हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाचा लोकप्रतिनिधींना मोठा फटका बसताना दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!