Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : देशात कोरोनमुक्त रुग्णांचे प्रमाण दिलासादायक , पंतप्रधान करणार ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

Spread the love

गेल्या  २४ तासांत देशभरात ९४ हजार ६१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय, मागील सलग दोन दिवस ९४ हजारांपेक्षा अधिकजणांनी करोनावर मात केलेली आहे. देशात एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असला, तरी कोरोनामुक्त रुग्णांच्या  संख्येतही वाढ होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट(बरे होणाऱ्यांचे प्रमाण) ७९.६८ टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दि . २३ सप्टेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. गेल्या काही आठवड्यापासून ज्या सात राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक होत आहे त्या सात राज्यांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. या सर्व मुख्यमंत्र्यांशी ते संवाद साधणार आहेत.

दरम्यान देशभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ६० टक्के संख्या पाच राज्यांमधील आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा समावशे आहे. या पाच राज्यांमध्ये कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एका दिवसात २३ हजार रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. तर, याच कालावधीत कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये १० हजारापेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

केंद्राच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाखांच्या वर गेली आहे.गेल्या  २४ तासांत देशात ९२ हजार ६०५ नवीन करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. तर एक हजार १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!