Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : ज्येष्ठ  विधिज्ञ अॅड. नानासाहेब शिंदे यांचे निधन, आंबेडकरी चळवळीतील महत्वाचा दुवा निखळला….

Spread the love

औरंगाबाद शहरातील ज्येष्ठ  विधिज्ञ आणि औरंगाबाद हाय कोर्ट बार असोसिएशनचे  माजी अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अॅड. नानासाहेब नरसुजी शिंदे यांचे शनिवार  दि.१९ सप्टेंबर रोजी  संध्याकाळी ९ .२० वा.  निधन झाले,  त्यांच्या जाण्यामुळे आंबेडकरी चळवळीतील महत्वाचा दुवा निखळला आहे .  नानासाहेब  मूळचे  परसोडा , ता.वैजापूर या गावचे होते, कायद्याचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी वकिली व्यवसाय चालू केला होता,यात प्रथितयश त्यांनी मिळवले होते, अनेक गरीब पक्षकारांन कडून फीस न घेता त्यांनी न्यायालयात त्यांचे खटले लढून त्यांना न्याय मिळवून दिला होता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या आई वडिलांना ते कायमचे प्रेरणादायी मानत होते, प्रचंड अभ्यासु व शांतीशील व्यक्तीमत्व म्हणून सर्व स्तरात त्यांची ओळख होती.

गरीब विद्यार्थीना शिक्षणाची मदत व्हावी म्हणून त्यांनी नालंदा शिक्षण संस्था निर्माण केली होती. अभयराज प्रतिष्टान चे अध्यक्ष अभयराज शिंदे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात  पत्नी, मुलगा, सून, ४ मुली, ४ जावई ,नातवंडे, भाचे, बहीण असा मोठा परिवार आहे, त्यांच्यावर आजच सकाळी १० वा, प्रतापनगर, उस्मानपूरा, औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नानासाहेब शिंदे हे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते होते आपल्या तारुण्यात त्यांनी रिपब्लिकन पक्षात जोमाने कार्य केले . तत्कालीन रिपब्लिकन पक्षाचे नेते भाऊसाहेब मोरे आणि अशोक निळे यांच्यासोबत विविध सामाजिक आंदोलनात त्यांचा मोलाचा सहभाग होता. गायरान भूमिहीनांचे आंदोलन , विद्यापीठ नामांतर आंदोलनात यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

त्यांच्या निधनाबद्दल प्राचार्य डॉ. एम . ए . वाहूळ, ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे, अॅड. विष्णू ढोबळे , अॅड. सुभाष गायकवाड , अॅड. मनोहर टाकसाळ , अॅड. अभय टाकसाळ , अॅड. बाबासाहेब वाव्हळकर, कॉ. प्रकाश बनसोडे, अॅड., पोपट गायकवाड, प्रा. बाबा गाडे आदींनी त्यांना आपली अदारंजली अर्पण केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!