Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द ?

Spread the love

राज्य सरकारने घाई घाईत अचानक आयोजित दादरच्या इंदू मिल येथे होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ अखेर पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असतं याबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत हा सोहळा पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले आहे . दरम्यान यावरून विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दादरच्या इंदू मिल येथे होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा  पायाभरणी समारंभ काल आयोजित केला होता . या सोहळ्याला मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेतला जात होता.  हे निदर्शनास येताच त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. हा कार्यक्रम आता नवी तारीख निश्चित करून पूर्ण नियोजनाअंती होणार आहे.

याबाबत आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे कि , इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार आहे. यात कुणीही राजकारण करू नये’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे कि , राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर एमएमआरडीएने पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले होते, मात्र अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश मी दिले आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे नमूद केले आहे.

दरम्यान, २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या स्मारकात बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा राहणार असून या पुतळ्याचा पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केवळ १६ मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्रिमंडळातीलही काही सदस्यांना आमंत्रण दिले गेले नाही. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी त्यावरून मंत्रिमंडळात नाराजीचा सूर होता. या सर्वाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आजचा कार्यक्रम पुढे ढकलून मोठा वाद टाळला आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा पुतळ्याला विरोध

या स्मारकावर आपली प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि , हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे असा निर्णयमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता त्यानुसार हे स्मारक व्हावे अशी आपली इच्छा असून दो . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आपला विरोध आहे. दरम्यान रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त करून स्मारकाच्या कामाला शुभेच्छा दिल्या. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घाई घाईत कोणालाही न सांगता , कळवता हा कार्यक्रम घेण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्न उपस्थित करून हे सर्व काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गी लावले असल्याची आठवण करून दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!