Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ताजी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्ष बंगल्यावर ” गुफ्तगू…”

Spread the love

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या परीस्ठीच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात महत्वाची  बैठक नुकतीच झाली असून त्यासाठी हे दोन्हीही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर एकमेकांना भेटून चर्चा केली . शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहचले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून याबाबत  एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.


एएनआयच्या वृत्तानुसार या दोघांमध्ये ४५ मिनिटं चर्चा पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत मुंबईत उद्या होणाऱ्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, जीएसटीचा केंद्राकडून येणारा परतावा आणि मुख्य म्हणजे राज्यातील आयएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान ही बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधले काही मंत्री वर्षा बंगल्यावर उपस्थित झाले आहेत. तर काही वेळापूर्वीच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. शरद पवार यांचा सल्ला आपण घेत असतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीही सांगितलं आहे. दरम्यान करोनाच्या संकटातून महाराष्ट्राला कसं बाहेर काढायचं यावरही याआधी या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. आता सध्या मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये या विषयावर आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याचं समजतं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!