Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शेतकऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्या सरपंच पतीला जामिन

Spread the love

औरंगाबाद – शेतकर्‍याकडून १० हजार रु. लाच स्वीकारणाऱ्या  सरपंच पतीला एसीबीचे विशेष न्यायाधिश ए.डी. साळुंके यांनी जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
महात्मा गांधी राष्र्टीय रौजगार हमी योजने अंतर्गत समृध्द महाराष्र्ट जन कल्याण योजनेत नाव समाविष्ठ करण्यासाठी दरेगावच्या शेतकर्‍याला आरोपी गणेश रामू बोर्डेने १०हजार रु.लाच स्विकारली. एसीबी ने बोर्डे ला विशेष न्यायाधिश ए.डी. साळुंके यांच्या समोर हजर केले. आरोपीचे वकील अॅड. प्रशांत नागरगोजे यांनी आरोपी चौकशी पूर्ण होई पर्यंत दर सोमवारी सकाळी ११ते २ या वेळैत एसीबी कार्यालयात हजर राहून एसीबीला तपासात मदत करेल असा युक्तीवाद केला. न्या. साळुंके यांनी अॅड.नागरगोजे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत १५ हजाराच्या जामिनावर आरोपी बोर्डेला सोडण्याचे आदेश दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!