Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : वापरलेले पीपीई किट व इतर साहित्य रस्त्यावर फेकले, गुन्हा दाखल

Spread the love

औरंगाबाद – वडगाव कोल्हाटी परिसरात वापरलेले पीपीई किटस, हॅंडग्लोव्हस, व इतर वस्तू रस्त्यावर फेकलेल्या आढळल्या प्रकरणी गुरुवारी रात्री १०.३० वा. वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौलताबाद आरोग्य केंद्राचे अधिकारी बामणे यांना आज संध्याकाळी ५.३०वा. फोनवर अज्ञात व्यक्तीने माहिती दिली की, वडगाव कोल्हाटी शिवारात एनआरबी कंपनीजवळील कच्च्या रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट कचरा टाकण्यात आला आहे. दौलताबादच्या वैद्यकीय अधिकारी पुष्पलता पुंडलिक सावंत (५८) यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. व वाळूज औद्योगिक पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय विजय घेरडे, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या कचर्‍यामधे वाळूज हास्पिटलच्या काही पावत्याही आढळल्या आहेत.पुष्पलता सावंत यांच्या फिर्यादीवरुन वरील गुन्हा दाखल झाला आहे.अशी माहिती पोलिस कर्मचारी भिमराव शेवगे यांनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घेरडे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!