Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : आमदार नारायण कुचेंना खंडपीठाचा मोठा दिलासा, भाच्याने दाखल केलेला गुन्हा रद्द

Spread the love

औरंंंगाबाद : जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलिस ठाण्यात बदनापूरचे आ. नारायण कुचे यांच्याविरूद्ध भाच्याने दाखल केलेला गुन्हा न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने रद्द करण्याचे आदेश बुधवारी (दि.१६) दिले.

तक्रारदार डोंगरे यांनी मूळ तक्रारी ऐवजी वेगळ्याच स्वरूपाची तक्रार सादर करून कुचे यांना प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा दुरुपयोग केला. कुचे यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेला गुन्हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरफायदा घेणारा आहे. अशा स्वरूपाची निरीक्षणे नोंदवत खंडपीठाने कुचे यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले.
बदनापूर तालुक्यातील रहिवासी दीपक लक्ष्मण डोंगरे यांनी २ मार्च २०२० रोजी चंदनझिरा पोलीस स्टेशन जालना येथे एक महिला घाणेरड्या भाषेतील मेसेजेस तसेच फोटोग्राफ पाठवत असल्याची तक्रार सादर केली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेचा जवाब नोंदविला. त्यानंतर आपल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करीत आहे त्यामुळे गुन्हा नोंदवण्याचे आदेश संबंधित पोलीस स्टेशन यांना द्यावे म्हणून डोंगरे यांनी खंडपीठात याचिका सादर केली. खंडपीठाने डोंगरे यांच्या तक्रारीवरून कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित पोलिस ठाण्याला दिले. त्यानंतर डोंगरे यांनी दिनांक ७ जुलैला नव्याने सविस्तर तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात सादर केली व त्यामध्ये बदनापूर मतदार संघाचे आमदार नारायण कुचे यांनाही गोवले. सदर तक्रारीनुसार मेसेज पाठवणा-या महिलेसोबतच आमदार नारायण कुचे व इतर एक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
चंदनजिरा पोलीस ठाण्यात आपल्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करावा म्हणून नारायण कुचे यांनी खंडपीठात अ‍ॅड. देवदत्त पालोदकर यांच्यावतीने याचिका दाखल केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!